पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेत त्यांनी काँग्रेसपक्षासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरही टीका केली. आघाडीत एक असा पक्ष आहे, की ज्यांनी बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांच्या हातामध्ये स्वत:चा रिमोट कंट्रोल दिला आहे, अशी टीका पंतप्रधानांनी केली.
काय म्हणाले मोदी?
एकदा तरी काँग्रेसच्या राजपुत्राच्या तोंडातून हिंदूहृदयसम्राट बोलायला लावा. म्ही असं केलं तर तुम्हाला चांगली झोप येईल. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागणार नाही, असा टोला त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आमचं सरकार मुंबईला कनेक्टीव्हीच्या प्रत्येक प्रश्नापासून दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईच्या सर्व दिशेला वेगानं काम होत आहे. आपल्या देशात अनेक दशकं काँग्रेसचं सरकार होतं. इथंही काँग्रेसचं सरकार होतं. पण, त्यांनी मुंबईसाठी काहीही प्लॅनिंग केलं नाही, असं त्यांनी सांगितलं.
मुंबईचा स्वभाव म्हणजे प्रामाणिकता, कठोर मेहनत, पुढे नेण्याची धडपड. पण काँग्रेसचा स्वभाव म्हणजे भ्रष्टाचार, देशाला मागे नेणं, विकासकामात अडथळा आणणं हा आहे. हा विचार असलेले लोकं मुंबईला कधीही पुढं नेऊ शकत नाहीत. मुंबईकरांचा एकमेकांना जोडण्यावर विश्वास आहे. काँग्रेसचा फक्त तोडण्यावर विश्वास आहे. सरकार बनवण्यासाठी काँग्रेसची पाण्याविना माशांसारखी वेळ झाली आहे. SC, ST, OBC मध्ये फुट पाडणे, आरक्षण रद्द करणे हा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीकाही मोदींनी केली.
( नक्की वाचा : Vote Jihad ला व्होट धर्मयुद्धानं उत्तर द्या, PM मोदींच्या उपस्थितीमध्ये फडणवीसांचं आवाहन )
मुंबईकरांना एकेकाळी दहशतीमध्ये राहावं लागत होतं, आता परिस्थिती बदलली आहे. भारतविरोधी लोकांना माहिती आहे. देशविरोधी काही केलं तर मोदी त्यांना पाताळातूनही सोडणार नाही. स्वातंत्र्यानंतर 6-7 दशक बाबासाहेबांचं संविधान पूर्ण देशात लागू झालं नाही. ही गोष्ट काँग्रेसनं लपवून ठेवली होती. जम्मू काश्मीरमध्ये बाबासाहेबांची राज्यघटना चालत नव्हती. 6-7 दशक बाबासाहेबांचा अपमान त्यांनी केला, असंही मोदींनी भाषणात सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world