Vande Metro : देशातील पहिल्या 'वंदे मेट्रो'चं किती आहे तिकीट? काय आहे वेगळेपण? वाचा संपूर्ण माहिती

Vande Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narndra Modi) यांनी सोमवारी (16 सप्टेंबर) देशातील पहिल्या 'वंदे मेट्रो' रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. काय आहेत वंदे मेट्रोची वैशिष्ट्यं पाहूया

जाहिरात
Read Time: 3 mins
Vande Metro चं नाव बदलून Namo Bharat Rapid Rail करण्यात आलं आहे.
मुंबई:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narndra Modi) यांनी सोमवारी (16 सप्टेंबर) देशातील पहिल्या 'वंदे मेट्रो' रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. गुजरातमधील भूज ते अहमदाबाद दरम्यान ही वंदे मेट्रो धावणार आहे. उद्घाटनाच्या काही तास आधी या रेल्वेचं नावं 'नमो भारत रॅपिड रेल' (Namo Bharat Rapid Rail) असं करण्यात आलं. कशी आहे ही भारतामधील सर्वात नवी वंदे मेट्रो रेल्वे? या रेल्वेनं तुम्हाला प्रवास करण्यासाठी किती तिकीट आहे? काय आहेत वंदे मेट्रोची वैशिष्ट्यं पाहूया

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे मार्ग ?

भूज-अहमदाबाद वंदे मेट्रोचा नंबर 94802 आहे. ही मेट्रो सकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी भूजहून सुटेल.  सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी अहमदाबादमध्ये दाखल होईल.  दोन्ही स्टेशनचं अंतर पूर्ण करण्यासाठी 5 तास 45 मिनिटं वेळ लागणार आहे. 

Advertisement

अहमदाबादहून भूजला जाणाऱ्या वंदे मेट्रोचा नंबर 94801 आहे. ही मेट्रो संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी अहमदाबादहून सुटेल आणि रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी भूजमध्ये पोहोचेल. या मार्गावर एकूण 9 ठिकाणी वंदे मेट्रो थांबणार आहे. ही रेल्वे आठवड्यातील 6 दिवस धावेल. भूज-अहमदाबाद (94802) वंदे मेट्रो  शनिवारी तर अहमदाबाद-भूज (94801) वंदे मेट्रो शनिवारी धावणार नाही. 

Advertisement

( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana : 'या' पद्धतीनं DBT स्टेटस चेक करा आणि राहा निश्चिंत! थेट खात्यात जमा होणार पैसे )
 

किती असेल तिकीट?

वंदे मेट्रोचं किमान तिकीट 30 रुपये आहे. तर संपूर्ण प्रवासाचं तिकीट 455 रुपये आहे. 'वंदे मेट्रो' ही देशातील ग्रामीण भागाला जोडण्याचं काम करणार आहे. या रेल्वेचं तिकीट सामान्य प्रवाशांचा विचार करुन मुंबईच्या एसी लोकलपेक्षा कमी ठेवलं आहे. 

Advertisement

200 किलोमीटर प्रती तास वेगानं धावू शकेल या पद्धतीनं वंदे मेट्रोचं डिझाईन करण्यात आलं आहे. पण याची गती 100 ते 150 किलोमीटर असेल. लहान गावातून महानगरात नोकरीसाठी जाणाऱ्यांसाठी वंदे मेट्रो अतिशय उपयोगी आहे.

( नक्की वाचा : Lakhpati Didi Scheme : महिलांचं भाग्य बदलणारी 'लखपती दीदी' योजना काय आहे? कसा करणार अर्ज? )
 

काय आहेत सुविधा?

- वंदे मेट्रोमध्ये पूर्ण वातानुकूलित डब्यासंह आरामदायी सीट्सची रचना करण्यात आली आहे. पारंपारिक मेट्रोपेक्षा येथील आसनव्यवस्था ही अधिक अपग्रेड आहे.
- वंदे मेट्रो जास्तीत जास्त 110 किमी प्रती तास वेगानं धावणार आहे. वेगवान प्रवासासह लवकर थांबण्यासाठी या गतीचा उपयोग होईल. प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी लवकर जाण्यासाठी याचा उपयोग होईल. 
- वंदे मेट्रोमध्ये अपघात टाळण्यासाठीचं कवच ( KAVACH ) तंत्रज्ञान,  फायर डिटेक्शन सिस्टीम, आपत्कालीन दिवे आणि एरोसोल-आधारित फायर सप्रेशन या सुविधा आहेत.
- वंदे मेट्रोमध्ये एकूण 12 कोच असून त्याची प्रवासीक्षमता 1,150 आहे. शहरी मेट्रोप्रमाणेच लवचिक दरवाजे, धूळीपासून मुक्त तसंच पावसापासून संरक्षण करणारे डबे यामध्ये आहेत. 
- वंदे मेट्रोमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी अनुकूल स्वच्छतागृहे, जेवण सेवा, चार्जिंग सॉकेट्स, सीसीटीव्ही तसंच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये ड्रायव्हरशी संवाद साधण्यासाठी टॉक-बॅक सिस्टमचाही समावेश आहे. 

वंदे मेट्रो ठरणार गेमचेंजर 

भारतीय रेल्वेचा चेहरा बदलणारी 'वंदे भारत' एक्स्प्रेस आता प्रवाशांच्या परिचयाची झाली आहे. देशातील वेगवेगळ्या भागात 'वंदे भारत' एक्स्प्रेस सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रातील 'वंदे भारत' ची एकूण संख्या 11 आहे. 'वंदे भारत' प्रमाणेच वंदे मेट्रो रेल्वे देखील गेम चेंजर ठरेल. विशेषत: छोट्या शहरांसाठी ही मेट्रो अधिक उपयोगी ठरणार आहे.

Topics mentioned in this article