राष्ट्रपती भवनात रविवारी संध्याकाळी (9 जून) होणाऱ्या भव्य शपथविधीची जय्यत तयारी सुरु आहे. त्याचवेळी सर्वांना मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार याची उत्सुकता आहे. भाजपाला लोकसभा निवडणूक 2024 मध्ये (Lok Sabha Election 2024 Result) 272 जागांसह पूर्ण बहुमत मिळवण्यात अपयश आलंय. त्यामुळे भाजपा आता NDA मधील मित्र पक्षांच्या पाठिंब्यानं सरकार बनवणार आहे. भाजपाच्या सहकारी पक्षांनी देखील कॅबिनेटमधील महत्त्वाच्या पदांवर दावा केला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील खातेवाटप आणखी किचकट बनलंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लखनौमधील भाजपाचे विजयी उमेदवार राजनाथ सिंह पुन्हा एकदा संरक्षण मंत्री होण्याची शक्यता आहे. यापूर्वी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमार स्वामी यांनी त्यांच्या पक्षाला सरकारमध्ये कृषी खात्यात रस आहे, असे संकेत दिले होते. एनडीएमधील मित्र पक्षांना महत्त्वपूर्ण खाती देण्याबाबत विचार सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्रामधील संभाव्य मंत्री
नितीन गडकरी - भाजपा
नितीन गडकरी - भाजपा
प्रतापराव जाधव - शिवसेना
प्रफुल पटेल - राष्ट्रवादी काँग्रेस
बिहारमधील संभाव्य मंत्री
जीतनराम मांझी - हम
ललन सिंह - जेडीयू
सुनील कुमार - जेडीयू
कौशलेंद्र कुमार - जेडीयू
रामनाथ ठाकूर - जेडीयू
संजय झा - जेडीयू
जितीन प्रसाद - भाजपा
राजीव प्रताप रुडी - भाजपा
संजय जयस्वाल - भाजपा
नित्यानंद राय - भाजपा
चिराग पासवान - एलजेपी
( नक्की वाचा : Nitish Kumar : बिहारमध्ये किंग ते देशात किंगमेकर, कशी पलटवली नितीशकुमारांनी बाजी? )
उत्तर प्रदेशमधील संभाव्य मंत्री
राजनाथ सिंह - भाजपा
अनुप्रिया पटेल - अपना दल
जयंत चौधरी - राष्ट्रीय लोकदल
कर्नाटमधील संभाव्य मंत्री
एचडी कुमारस्वामी - जेडीएस
प्रल्हाद जोशी - भाजपा
गोविंद करजोल - भाजपा
पीसी मोहन - भाजपा
( नक्की वाचा : Explainer नितीश कुमार, नायडूंना भाजपाकडून लोकसभा अध्यक्षपद आणि अर्थमंत्रालय का हवंय? )
मध्य प्रदेशातील संभाव्य मंत्री
ज्योतिरादित्य सिंधिया - भाजपा
शिवराज सिंह चौहान - भाजपा
तेलंगनातील संभाव्य मंत्री
किशन रेड्डी - भाजपा
ए. राजेंदर - भाजपा
डीके अरुणा - भाजपा
डी. अरविंद - भाजपा
बंडी संजय - भाजपा
ओडिशामधील संभाव्य मंत्री
धर्मेंद्र प्रधान - भाजपा
मनमोहन सामल - भाजपा
( नक्की वाचा : 9 जूनला जुळून आलेत जबरदस्त शुभ योग, मोदी 3.O सरकारला ठरणार फायदेशीर? )
राजस्थानमधील संभाव्य मंत्री
गजेंद्रसिंह शेखावत - भाजपा
दुष्यंत सिंह - भाजपा
केरळमधील संभाव्य मंत्री
सुरेश गोपी - भाजपा
बंगालमधील संभाव्य मंत्री
शांतुनू ठाकूर - भाजपा
आंध्र प्रदेशातील संभाव्य मंत्री
दग्गुबती पुरंदेश्वरी - भाजपा
के. राम मोहन नायडू - टीडीपी
जम्मूमधील संभाव्य मंत्री
जितेंद्र सिंह - भाजपा
जुगल किशोर शर्मा - भाजपा
आसाम आणि पूर्व भारतामधील संभाव्य मंत्री
सर्बानंद सोनोवाल - भाजपा
बिजूली कलिता मेधी - भाजपा
किरेन रिजिजू - भाजपा
बिप्लब देव - भाजपा
( नक्की वाचा : BJP स्पष्ट बहुमतापासून दूर, PM मोदींना करावा लागणार 5 मोठ्या आव्हानांचा सामना )
भाजपाकडं कोणती खाती ?
गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र या चार प्रमुख खात्यांसह शिक्षण आणि संस्कृती हे दोन वैचारिक विषयांवरील खाती भाजपा स्वत:कडं ठेवेल असं मानलं जात आहे. तर भाजपाच्या मित्रपक्षांना पाच ते आठ कॅबिनेट मंत्रीपदं मिळू शकतात. भाजपामधील अमित शाह, राजनाथ सिंह या दिग्गज नेत्यांचा मंत्रिमंडळातील समावेश नक्की मानला जातोय. तर लोकसभा निवडणुका जिंकणारे शिवराज सिंह चौहान, मनोहरलाल खट्टर आणि सर्बानंद सोनोवाल हे माजी मुख्यमंत्री देखील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत.
महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी खराब झालीय. तर बिहारमध्ये विरोधी पक्षानं पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. या दोन राज्यांवर फोकस असू शकतो, अशी माहिती सुत्रांनी दिलीय. महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात तर बिहारमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहे. भाजपामध्ये होणाऱ्या संघटनात्मक बदलांचा देखील मंत्रिमंडळाची यादी अंतिम करत असताना विचार केला जाईल.