'ईडीच्या माध्यमातून भाजपकडून तुरुंगात पाठवलं जात असल्याचे' विरोधी पक्षांचे आरोप फेटाळत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडून दाखल केलेली अधिकतर प्रकरणं राजकारणाशी संबध नसलेली व्यक्ती आणि संस्थाविरोधात असल्याचं सांगितलं. ANI वृत्तसंस्थेसोबत झालेल्या एका मुलाखतीदरम्यान पंतप्रधान म्हणाले की, प्रामाणिक व्यक्तीला घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र भ्रष्टाचारात सामील लोकांना पापाची भीती असते. पंतप्रधान पुढे म्हणाले, विरोधी पक्षांचे किती नेता तुरुंगात आहे? मला कोणी सांगत नाही... हे तेच विरोधी पक्षातील नेते आहेत , जे एकेकाळी सरकार चालवत होते? पापाची भीती आहे... एका प्रामाणिक व्यक्तीला कसली भीती वाटते? मी मुख्यमंत्री असताना च्यांनी माझ्या गृहमंत्र्याला तुरुंगात टाकलं होतं. देशातील नागरिकांनी समजून घ्यायला हवं की, ईडी कारवाईच्या केवळ 3 टक्के प्रकरणात राजकीय नेत्यांचा समावेश आहे आणि 97 टक्के राजकीय नसलेल्या व्यक्तींविरोधातील प्रकरणं आहेत.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ईडीकडून कारवाई करणाऱ्या आलेले एक तर राजकारणाशी संबंधित नसलेले, ड्रग माफिया, भ्रष्टाचारात अडकलेले आणि बेनामी संपत्ती बाळगणारे असे आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंमलबजावणी संचालनालयाचं कौतुक केलं. 2014 मध्ये केंद्रात कार्यभार सांभाळल्यानंतर या केंद्रीय यंत्रणेने भ्रष्टाचाराशी दोन हात करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. मोदी पुढे म्हणाले, 2014 पूर्वी ईडीने केवळ 5,000 कोटींची संपत्ती जप्त केली होती. त्यावेळी कोणीही ईडीची कारवाई करण्यापासून रोखलं होतं का आणि कोणाला याचा फायदा होत होता? माझ्या कार्यकाळात 1 लाख कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.