PM Modi Convoy Blue Book: ब्ल्यु बुक कशी असते? PM मोदींच्या कडक सुरक्षेशी नेमका संबंध काय, वाचा सविस्तर

PM Modi Security Blue Book: पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात किती गाड्या असाव्यात आणि सुरक्षेचा प्रोटोकॉल काय असतो? गृह मंत्रालयाचे सीक्रेट 'ब्ल्यु बुक' काय आहे? वाचा सविस्तर माहिती....

जाहिरात
Read Time: 2 mins
"PM Modi Security Blue Book: ब्ल्यु बुक म्हणजे काय?"
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • PM मोदींनी देशातील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी आपल्यासह ताफ्यातील गाड्या कमी केल्या आहेत
  • ब्ल्यु बुक हा गृह मंत्रालयाद्वारे तयार केलेले एक सीक्रेट प्रोटोकॉल मॅन्युअल असते
  • ब्ल्यु बुकला घटनात्मक दर्जा मिळालेला नाही
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

PM Modi Blue Book: जगातील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला इंधन बचतीचे आवाहन केले आहे. स्वतः पंतप्रधान मोदी देखील याची अंमलबजावणी करत आहेत. त्यांच्या ताफ्यात आता केवळ 4 गाड्या असतील, तर एरव्ही या ताफ्यात 12-15 गाड्या असतात. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांपासून ते मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करून सामान्य जनतेला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला (SPG) ताफ्यातील गाड्या कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. या दरम्यान पंतप्रधान आणि वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात नेमक्या किती गाड्या असतात, असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. ही सुरक्षा स्वतःहून ठरवली जाते की सुरक्षेशी संबंधित काही खास नियम आहेत? हे नियम कसे ठरवले जातात आणि ते कुठे लिहिलेले असतात? या सर्व बाबींचा उल्लेख असलेल्या 'ब्ल्यु बुक'बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

'ब्ल्यु बुक' म्हणजे नेमके काय?

ब्ल्यु बुक हे गृह मंत्रालयाद्वारे तयार केलेले एक सीक्रेट प्रोटोकॉल मॅन्युअल (Manual) आहे. यामध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित सुरक्षेचे अत्यंत कडक नियम नमूद केलेले असतात. हा दस्तऐवज केवळ सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या अधिकाऱ्यांकडेच सोपवला जातो. विशेष म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासूनच ब्ल्यु बुकची परंपरा चालत आली आहे. या पुस्तकाद्वारेच पंतप्रधानांच्या सुरक्षेचे कडक नियम ठरवले जातात. तसेच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचाही या पुस्तकात समावेश असतो. सुरक्षेच्या दृष्टीने हा दस्तऐवज अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

Advertisement

PTI फोटो.

(नक्की वाचा: Iran US War: पेट्रोल-डिझेल सोडा, 2027मध्ये जगावर उपासमारीचं संकट? सौदी अरामकोच्या CEOचा धडकी भरवणारा इशारा)

ब्ल्यु बुकमधील सुरक्षेशी संबंधित नियम

विशेष म्हणजे ब्ल्यु बुकला घटनात्मक दर्जा मिळालेला नाही. हा केवळ शिष्टाचाराशी संबंधित एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, जो गृह मंत्रालयांतर्गत येतो. या महत्त्वाच्या दस्तऐवजातील नियमानुसार, राष्ट्रपती किंवा पंतप्रधान जर एखाद्या राज्यात जाणार असतील, तर विमानतळावर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक उपस्थित असणे अनिवार्य आहे. या पुस्तकात मार्गाची सुरक्षा (Route Security), ध्वज लावणे, राष्ट्रगीत वाजवणे यापासून ते बसण्याच्या व्यवस्थेपर्यंत (Seating Arrangement) सर्व बाबींचा समावेश असतो.

PTI फोटो.

(नक्की वाचा : 117 कोटींचे 11 बंगले, 7 महागड्या गाड्या! देशाचे दुसरे सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री आहेत विजय; पण नंबर 1वर कोण?)

ब्ल्यु बुकमध्ये SPG साठी कोणत्या मार्गदर्शक सूचना आहेत?

देशाच्या पंतप्रधानांपासून ते उच्चस्तरीय नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील ब्ल्यु बुकनुसारच निश्चित केली जाते. यामध्ये एसपीजी (SPG) साठी अतिशय कडक मार्गदर्शक सूचना लिहिलेल्या असतात. या सूचनांनुसारच संबंधित नेत्यासाठी सुरक्षेचे चोख बंदोबस्त केले जातात.