- तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्याकडे एकूण 648.85 कोटी रुपयांची संपत्ती आहे
- विजय यांच्या नावावर आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर एकूण 11 बंगले असून व्यावसायिक इमारती, जमीन शेतीची जमीन
- विजय यांच्याकडे 7 आलिशान गाड्या आहेत
Thalapathy Vijay Net Worth: तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्याकडे 648 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते तमिळनाडूतील दुसरे सर्वात श्रीमंत आमदार ठरले आहेत. इतकेच नाही तर विजय हे देशातील दुसरे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री देखील आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आहेत, ज्यांच्याकडे 931 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.
तमिळनाडू राज्याबाबत सांगायचे झाले तर येथे सर्वात श्रीमंत आमदार लीमा रोज मार्टिन आहेत. त्यांच्याकडे 5,863 कोटी रुपयांची संपत्ती आहे. लीमा रोज मार्टिन या लालगुडी मतदारसंघातून AIADMK च्या आमदार आहेत. श्रीमंत आमदारांच्या यादीत विजय दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर विजय यांच्याच टीव्हीके (TVK) पक्षाचे आमदार आधव अर्जुन आहेत, ज्यांची संपत्ती 534 कोटी रुपये आहे.
विजय यांच्या संपत्तीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे?
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, विजय यांच्याकडे एकूण 648.85 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये 426.20 कोटी रुपयांची जंगम (चल) आणि 222.65 कोटी रुपयांची स्थावर (अचल) संपत्तीचा समावेश आहे. तर विजय यांच्यावर 7.63 कोटी रुपयांचे कर्ज (देणी) आहे.
बँक खात्यात 330.48 कोटी रुपये जमा आहेत. त्यांच्याकडे 19.37 लाख रुपयांचे शेअर्स आहेत, तर 75.50 कोटी रुपयांहून अधिक रक्कम त्यांनी कर्ज म्हणून इतरांना दिली आहे. विशेष म्हणजे विजय यांच्याकडे 13.52 कोटी रुपयांच्या 7 आलिशान गाड्या आहेत. त्यांच्या ताफ्यातील सर्वात महागडी गाडी 'टाटा कारवां' (Tata Caravan) असून या वाहनाची किंमत 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच त्यांच्याकडे 6.47 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत.
(नक्की वाचा: थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात त्रिशा कृष्णने ऐश्वर्याचा लुक कॉपी केला? 26 वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल)
त्यांच्याकडे 222 कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर संपत्ती असून, त्यात 117 कोटी रुपयांचे केवळ बंगले आहेत. विजय यांच्या नावावर 10 आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 1 बंगला आहे. याशिवाय 82.81 कोटी रुपयांच्या व्यावसायिक इमारती (Commercial Buildings) आहेत. त्यांच्याकडे 22 कोटी रुपयांची जमीन आणि 20 लाख रुपयांची शेतीची जमीन देखील आहे.

चंद्राबाबू नायडू आहेत देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे 931.83 कोटी रुपयांची संपत्ती आहे. चंद्राबाबू नायडू यांच्यावर 10.38 कोटी रुपयांचे कर्ज आहे. नायडू यांच्याकडे 810.42 कोटी रुपयांची जंगम आणि 121.41 कोटी रुपयांची स्थावर संपत्ती आहे.
वर्ष 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नायडू यांच्याकडे 767.44 कोटी रुपयांचे शेअर्स किंवा बॉन्ड्स आहेत. तसेच त्यांच्याकडे 3.24 कोटी रुपयांचे दागिने आहेत.
(नक्की वाचा : Thalapathy Vijay Son: थलपती विजय यांच्या मुलाचे 5 फोटो, वडिलांची आहे कार्बन कॉपी; या भूमिकेत गाजवणार सिनेसृष्टी?)
याव्यतिरिक्त चंद्राबाबू नायडू यांच्याकडे 55 कोटी रुपयांची शेतीची जमीन आहे. 77.33 लाख रुपयांचा प्लॉट आणि 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची व्यावसायिक इमारत आहे. तसेच 35.53 कोटी रुपये किमतीचे दोन बंगले त्यांच्या मालकीचे आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world