पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना (PM Modi Independence Day Speech) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) उल्लेख केला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानांनी RSS च्या योगदानाचा गौरव केला. यंदा RSS च्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असून, मोदींनी या संघटनेला 'जगातील सर्वात मोठी बिगर सरकारी संघटना असे संबोधले.
( नक्की वाचा: 'दिवाळीत देशवासियांसाठी मोठं गिफ्ट', लाल किल्ल्यावरुन PM मोदींची ऐतिहासिक घोषणा! )
पंतप्रधान नरेंद्र मोदी RSS बद्दल काय म्हणाले ?
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात RSS च्या राष्ट्रसेवेच्या 100 वर्षांच्या योगदानावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "आज लाल किल्ल्याच्या प्राचीरवरून 100 वर्षांच्या राष्ट्रसेवेच्या या प्रवासात योगदान देणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे मी आदरपूर्वक स्मरण करतो." मोदींनी RSS ला जगातील सर्वात मोठी NGO म्हणत, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशासाठी दिलेल्या योगदानाचा आणि त्यागाबद्दल गौरवोद्वागार काढले. 25 सप्टेंबर 1925 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी संघााला 100 वर्षे पूर्ण होत असून त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाबद्दल गौरवोद्गार काढले आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी पहिल्यांदाच केला RSS चा उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की, "आजपासून 100 वर्षांपूर्वी एका संघटनेचा जन्म झाला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ... 100 वर्षांची राष्ट्रसेवा हे एक अत्यंत गौरवपूर्ण कार्य आहे. व्यक्तीनिर्माणापासून राष्ट्रनिर्माणाचे लक्ष्य घेऊन लाखो स्वयंसेवकांनी आपल्या जीवनाचा त्याग केला." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, RSS ची 100 वर्षांची ही गौरवशाली आणि समर्पित परंपरा देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
( नक्की वाचा: PM मोदींनी GST बद्दल केलेल्या घोषणांचा अर्थ काय? कोणत्या वस्तू स्वस्त होणार? )