PM Modi on Paper Leak: "दोषींवर कडक कारवाई करणार...", पेपरफुटीवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

PM Modi on Paper Leak: दोषींवर कडक कारवाई करणार असून त्यासाठी फास्टट्रॅक खटला चालवला जाणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

PM Modi on Paper Leak: नीट पेपरफुटीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्ट करून तरुणांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दोषींवर कडक कारवाई करणार असून त्यासाठी फास्टट्रॅक खटला चालवला जाणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत या निर्णयाची माहिती दिली असून, सर्व संबंधित विभागांना या संदर्भात तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

पंतप्रधान नरेद्र मोदी यांचं ट्वीट

'युवांचे भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता' - पंतप्रधान मोदी

सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, "देशातील तरुणांचे कल्याण आणि त्यांचे भविष्य यापेक्षा आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे काहीही नाही. पेपर लीक प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर आणि अत्यंत कठोर शिक्षा मिळावी यासाठी आम्ही फास्ट-ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित अधिकारी आणि विभागांना याबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत."

पंतप्रधानांनी पुढे स्पष्ट केले की, हा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांच्या हक्कांचे आणि भविष्याचे रक्षण करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांची एक मालिका आहे. जे लोक आपल्या तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा किंवा त्यांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतील, त्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही किंवा सोडले जाणार नाही.
 


Topics mentioned in this article