NDTV World Summit : PM मोदींनी मांडलं 125 दिवसांचं प्रगतीपुस्तक, वाचा मोदी 3.0 मध्ये कसा बदलला भारत?

NDTV World Summit 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी (21 ऑक्टोबर) NDTV वर्ल्ड समिट कार्यक्रमात भारतासंबंधीचं व्हिजन मांडलं

जाहिरात
Read Time: 2 mins
भारत आज उगवती शक्ती आहे - PM Modi
मुंबई:

NDTV वर्ल्ड समिट 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी (21 ऑक्टोबर) NDTV वर्ल्ड समिट 2024 या विशेष कार्यक्रमाला संबोधित केलं. जगभरात उलथापालथ सुरु असताना भारत आशेचा किरण बनला आहे, असं वक्तव्य मोदींनी केलं. जगभरातील गोष्टींचा परिणाम आमच्यावरही होतो. आमच्यासमोरही आव्हान आहे. पण, आमच्याकडं सकारात्मक वातावरण आहे. आज भारत प्रत्येक क्षेत्रात वेगानं काम करत आहे. हे अभूतपूर्व आहे. भारताची गती, कामाची व्याप्ती अभूतपूर्व आहे, असं त्यांनी सांगितलं. 

पंतप्रधान मोदींनी सांगितलं भारत एका सकारात्मक विचारानं पुढं जात आहे. 2047 पर्यंत विकसित देश होणं याच विचाराचा भाग आहे. विकसित देशाच्या विचारांशी 140 कोटी लोकं कनेक्ट झाले आहे. भारत आज विकसनशील देश आहे आणि उगवती शक्ती आहे. आज जगभरातील सर्वात जास्त तरुण भारतामध्ये आहेत. युवा शक्ती देशाचं पोटेंशियल आहे.आता 2047 पर्यंत विकसित भारत हे लक्ष्य आहे.

भारताकडं दोन AI आहेत. एक AI आणि दुसरा एस्पिरेशनल इंडिया. जेव्हा AI ची शक्ती Aspirational India ला मिळते त्यावेळी विकासाची गती वाढणे स्वाभाविक आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी 125 दिवसांच्या कामाचं प्रगतीपुस्तक देशापुढं सादर केलं

  • 125 देशांमधील 3 कोटी गरिबांसाठी पक्क्या घरांना मजुरी
  • 9 लाख कोटींच्या पायाभूत सुविधांचे काम सुरु
  • 15 नवीन वंदे भारतचा शुभारंभ
  • 8 नव्या विमानतळांचे काम सुरु
  • 2 लाख कोटी तरुणांना पॅकेज
  • शेतकऱ्यांच्या खातामध्ये 21 हजार कोटींचं हस्तांतरण
  • 70 पेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार
  • 5 लाख घरांच्या गच्चीवर सौर ऊर्जेचं प्लांट लानण्यात आले.
  • आईच्या नावानं 90 कोटी झाडं लावण्यात आली.
  • सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये 6-7 टक्के वाढ
  • फोरेक्स 650 बिलियन डॉलर ते 700 बिलियन डॉलरच्या पार