PM Modi in Kolkata: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकात्याच्या पवित्र हुगळी नदीच्या काठावर काही निवांत क्षण व्यतीत केले. ऐतिहासिक हुगळी घाटावरून नौकेत स्वार होत त्यांनी पश्चिम बंगालच्या विकासाचा आणि बंगाली जनतेच्या समृद्धीचा पुनरुच्चार केला. हा प्रवास नाविक गोरंगो बिस्वास यांच्यासाठी आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण बनला आहे.
"ती मिठी म्हणजे आशीर्वादच!" - नाविक गोरंगो
पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात एका सामान्य नाविकाचे नशीब उजळले. गोरंगो बिस्वास या नाविकाने आपला अनुभव सांगताना म्हटले की, "पंतप्रधान माझ्या नौकेत बसतील असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. त्यांच्या सांगण्यानुसार मी नाव गंगा नदीच्या मध्यभागी नेली. त्यांना पाहून मी थक्क झालो होतो."
नौकेतून उतरल्यानंतर पंतप्रधानांनी स्वतःहून पुढे येत गोरंगो यांना मिठी मारली. "त्यांनी केवळ मला मिठी मारली नाही, तर माझ्या कष्टाचे मोल समजून मला सन्मान दिला. ते माझ्यासाठी एका मोठ्या आशीर्वादासारखे होते," भावुक होत गोरंगो यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रवासाचे भाडे म्हणून पंतप्रधानांनी गोरंगो यांना 1000 रुपये दिले.
(नक्की वाचा- Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर पंतप्रधान मोदींनी या प्रवासादरम्यान आपला फोटोग्राफीचा छंदही जोपासले. कोलकात्याची ओळख असलेला ऐतिहासिक हावडा ब्रिज त्यांनी जवळून पाहिला आणि त्याचे फोटो टिपले. हुगळी नदीवरील भव्य विद्यासागर सेतूचे सुंदर फोटो स्वतःच्या कॅमेऱ्यात कैद केले. (नक्की वाचा- Job News: नोकरी ठरतेय जीवघेणी! दरवर्षी 8 लाखांहून अधिक मृत्यू; कारणंही तितकंच चिंताजनक पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, हा केवळ दौरा नसून आई गंगेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी होती. पश्चिम बंगालचा विकास आणि तेथील महान लोकांच्या आनंदासाठी काम करण्याचे वचन त्यांनी यावेळी पुन्हा एकदा दिले.कॅमेऱ्यात कैद केले 'सिटी ऑफ जॉय'
"आई गंगेचे आभार मानण्याची संधी"