जाहिरात

Union Budget 2025 : गरीब आणि सर्वसामान्यांना अर्थसंकल्पातून गुड न्यूज मिळणार, PM मोदींनी दिले संकेत

PM Narendra Modi : देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गाला लक्ष्मी देवीची विशेष कृपा लाभावी, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारतासाठी नवी उर्जा देईल, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. 

Union Budget 2025 : गरीब आणि सर्वसामान्यांना अर्थसंकल्पातून गुड न्यूज मिळणार, PM मोदींनी दिले संकेत

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (31 जानेवारी) सुरु झाली आहे. अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गाला लक्ष्मी देवीची विशेष कृपा लाभावी, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारतासाठी नवी उर्जा देईल, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात पोहोचले आहेत. यावेळी पत्रकारांना संबोधित करताना पीएम मोदींनी म्हटलं की, "देवी लक्ष्मीचे स्मरण करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे. मी लक्ष्मीला प्रार्थना करतो की देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गाला लक्ष्मी देवीची विशेष कृपा लाभावी." पंतप्रधान मोदींनी यातून सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याचे संकेत दिले असल्याची चर्चा आहे.  

(नक्की वाचा- Union Budget 2025 : घरच्यांपासून दूर, फोनही बंद... बजेटच्या 10 दिवसआधी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केलं जातं 'कैद')

PM नरेंद्र मोदींनी म्हटलं की, 'देशातील जनतेने माझ्यावर तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवली. तिसऱ्या कार्यकाळाचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे." मिशन मोडमध्ये काम करणार असल्याचंही पंतप्रधान मोदींना सांगितलं. यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारताला नवी ऊर्जा देईल. 2047 मध्ये स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा हा अर्थसंकल्प देशाने विकसित भारतासाठी घेतलेल्या संकल्पात नवा आत्मविश्वास निर्माण करेल. आपल्या सामूहिक प्रयत्नांनी हा संकल्प पूर्ण करू, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

(नक्की वाचा : Income Taxचे ओझे कमी करा, Mutual Fundवरील करांना कात्री लावा; अर्थमंत्र्यांना विनंती)

इनोव्हेशन, इनक्लुजन आणि इनवेस्टमेंट 

मिशन मोडमध्ये देश सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. इनोव्हेशन, इनक्लुजन आणि इनवेस्टमेंट हा आपल्या आर्थिक विकासाचा रोडमॅपचा राहिला आहे. या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक विधेयकांवर चर्चा होणार आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. देश मजबूत करणारे कायदे केले जातील, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. 

पाहा व्हिडीओ

Listen to the latest songs, only on JioSaavn.com