दुबईमध्ये राहणारा आणि सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेला ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर आणि फोटोग्राफर अनुनाय सूद यांचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी अनुनाय सूद यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून ही दुःखद बातमी जाहीर केली. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी त्याने अखरेचा श्वास घेतला.
कुटुंबीयांची भावनिक पोस्ट
अनुनाय सूद याच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. कुटुंबीयांनी अत्यंत दुःखात ही बातमी शेअर करताना त्याच्या फॉलोअर्सना आणि हितचिंतकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय की, "आम्ही अत्यंत दुःखद अंतःकरणाने आमच्या लाडक्या अनुनाय सूदच्या निधनाची बातमी देत आहोत. या कठीण काळात आम्हाला समजून घ्यावे आणि गोपनीयता राखावी, अशी नम्र विनंती करतो. तसेच, कुणीही गर्दी करू नका."
(नक्की वाचा- मनसोक्त क्रिकेट खेळला, पाणी प्यायला अन् जमिनीवर कोसळला; LIC अधिकाऱ्यांचा जागेवरच मृत्यू)
कोण होते अनुनाय सूद?
अनुनाय सूद हे एक प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर आणि फोटोग्राफर होता. त्याचे इंस्टाग्रामवर 14 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते, तर त्यांच्या यूट्यूब चॅनलचे 3.8 लाख सबस्क्राइबर्स होते. त्याच्या आकर्षक ट्रॅव्हल फोटो, रील्स आणि व्लॉग्ससाठी तो खूप लोकप्रिय होता. 2022, 2023 आणि 2024 मध्ये त्यांचे नाव फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 डिजिटल स्टार्सच्या यादीत समाविष्ट होते.
(नक्की वाचा- Jemimah Rodrigues: जेमिमाह रॉड्रिग्सने वांद्रे सोडून नवी मुंबईत घेतलं नवीन घर, कारण वाचून अभिमान वाटेल!)
निधन होण्यापूर्वी अनुनाय सूद लास वेगास येथे होता, अशी माहिती त्याच्या शेवटच्या सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीवरून मिळते. दोन दिवसांपूर्वी त्याने लास वेगासमध्ये स्पोर्ट्स कारसोबत एक फोटो शेअर केला होता. या अकाली एक्झिटमुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे