MahaKumbh Stampede : आताची मोठी बातमी, प्रयागराजमधील कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 15 जणांचा मृत्यू; अमृतस्नान रद्द

mauni amavasya 2025 : प्राथमिक माहितीनुसार, संगमावर गर्दी होऊ नये यासाठी विविध घाटांवर भाविकांचं डायव्हर्जन करण्यात आलं होतं. मात्र सर्वांना संगमावरच स्नान करायचं असल्यानं भाविक त्या दिशेने जात होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
MahaKumbh Stampede : आताची मोठी बातमी, प्रयागराजमधील कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 15 जणांचा मृत्यू; अमृतस्नान रद्द

आज अमृतस्नानाआधी प्रयाराजमधील महाकुंभमध्ये (Mahakumbh 2025) चेंगराचेंगरी झाल्याची बातमी समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत 15 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 28 जानेवारीला महाकुंभमध्ये एक कोटींहून अधिक जण दाखल झाल्याची माहिती होती. आज मौनी अमावस्येनिमित्त (mauni amavasya 2025) महाकुंभमध्ये मोठी गर्दी होणार असल्याची शक्यता (Mahakumbh Mauni Amavsya Amrit Snan ) व्यक्त केली जात होती. त्यातच आज ही मोठी दुर्घटना घडली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्राथमिक माहितीनुसार, संगमावर गर्दी होऊ नये यासाठी विविध घाटांवर भाविकांचं डायव्हर्जन करण्यात आलं होतं. मात्र सर्वांना संगमावरच स्नान करायचं असल्यानं भाविक त्या दिशेने जात होते. एकाच ठिकाणी जास्त गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. अनेक महिलांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. या घटनेनंतर जखमींना महाकुंभस्थित केंद्रीय रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. अद्याप जखमींचा आकडा कळू शकलेला नाही. मात्र ही संख्या जास्त असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज मौनी अमावस्येला अमृतस्नान असल्याने 8-10 कोटी भाविक महाकुंभमध्ये पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार, स्नान करणाऱ्या घाटावर हा अपघात घडला. ही घटना साधारण रात्री 1 वाजेदरम्यान घडली. इतकी गर्दी झाली होती की, लोक एकमेकांच्या अंगावर होते. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Mauni Amavasya 2025 : मौनी अमावस्या कधी आहे? त्या दिवशी मौनाचे धार्मिक आणि आध्यात्मिक फायदे काय?

अमृतस्नान रद्द...
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानंतर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. यादरम्यान आज आखाड्यांचा अमृतस्नान रद्द करण्यात आला आहे. आखाडा परिषदेने अमृतस्नान रद्द केलं आहे. आता सर्व 13 आखाड्यांचं अमृतस्नान रद्द झालं आहे. 

Advertisement