मध्य प्रदेशात दिंडोरीतून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर पाच महिन्यांची गर्भवती महिलेकडून रक्ताने माखलेले रुग्णालयातील बेड साफ करुन घेण्यात आले. रामराज मारवी (२८) असे मृताचे नाव आहे. त्याची दोन भाऊ आणि वडिलांना जमिनीच्या वादातून हत्या केली.
रामराजला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होचे. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र पतीच्या मृत्यूच्या दु:खात असलेल्या महिलेकडून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पती ज्या बेडवर उपचार घेत होता तो बेड साफ करुन घेतला.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, रुग्णालयातील काही कर्मचारी पीडित महिलेला काही सूचना करताना आणि पाण्याची बाटली देताना दिसले. रुग्णालय प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता, पत्नी पुराव्यासाठी नमुने गोळा करत होती. महिला रक्ताचे नमुने गोळा करत होती, कारण तिच्या पतीने बेदम मारहाण केली होती. तिला कोणीही बेड साफ करण्यास सांगितले नव्हते.
रामराज यांचे दोन मोठे भाऊ, शिवराज मारवी (40) आणि रघुराज मारवी (35) आणि त्यांचे वडील धरमसिंग मरावी (65) यांची शुक्रवारी त्याची निर्घृण हत्या केली. पोलिसांना याप्रकरणी तीन संशयितांना अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.