Pregnant Woman Thrown : गर्भवती महिलेला धावत्या ट्रेनमधून फेकले, तामिळनाडूतील संतापजनक घटना

Crime News : महिलेच्या हाताला, पायाला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. तिला उपचारासाठी वेल्लोर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपीला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pregnant Woman Thrown from running train

गर्भवती महिलेला धावत्या ट्रेनमधून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या कोइम्बतून येथे ही घटना घडली आहे. महिलेसोबत आरोपीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने विरोध केल्याने आरोपीने तिला धावत्या ट्रेनमधून ढकलून दिले. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला गुरुवारी तिरुप्पूरहून आंध्र प्रदेशातील चित्तूरला कोइम्बतूर-तिरुपती इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेनने एकटीच प्रवास करत होती. पीडित महिला सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी अनारक्षित तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढली आणि महिलांच्या डब्यात बसली. त्यावेळी काही महिला डब्यात उपस्थित होत्या, असे पोलिसांनी सांगितले. 

(नक्की वाचा- Repo Rate Cut : रेपो दर म्हणजे नेमकं काय? कर्जाचा EMI किती कमी होणार? )

ट्रेन 10 वाजून 15 मिनिटांना जोलारपेट्टई रेल्वे स्थानकावर पोहोचली तेव्हा सर्व महिला खाली उतरल्या आणि डबा रिकामा झाला. ट्रेन सुरू होताच, आरोपी हेमराज हा डब्यात चढला. तो काही वेळ बसला आणि त्याने पाहिले की महिला एकटीच डब्यात आहे. त्यावेळी त्यांनी महिलेवर तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडितेने त्याला लाथ मारून प्रतिकार केला. त्यांतर चिडलेल्या आरोपीने पीडित महिलेला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

(नक्की वाचा- Ratan Tata : रतन टाटांच्या मृत्यूपत्रात 'या' व्यक्तीचं नाव वाचून अनेकजण चकीत, मिळणार जवळपास 500 कोटींची संपत्ती)

महिलेच्या हाताला, पायाला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. तिला उपचारासाठी वेल्लोर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपीला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Advertisement

Topics mentioned in this article