जाहिरात

Ratan Tata : रतन टाटांच्या मृत्यूपत्रात 'या' व्यक्तीचं नाव वाचून अनेकजण चकीत, मिळणार जवळपास 500 कोटींची संपत्ती

RatanTata Will : मोहिनी मोहन यांच्या कुटुंबियांकडे स्टॅलियन ही ट्रॅव्हल एजन्सी होती. 2013 मध्ये, स्टॅलियनचे ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या ताज सर्व्हिसेसमध्ये विलीनीकरण करण्यात आले.

Ratan Tata : रतन टाटांच्या मृत्यूपत्रात 'या' व्यक्तीचं नाव वाचून अनेकजण चकीत, मिळणार जवळपास 500 कोटींची संपत्ती

दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्युपत्राने त्यांच्या जवळच्या लोकांना धक्का बसला आहे. रतन टाटा यांनी उर्वरित संपत्तीचा एक तृतीयांश म्हणजेच अंदाजानुसार 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती अशा व्यक्तीला दिली आहे ज्यांना फारसं कुणी ओळखत नाही. टाईम्स ऑफ इंडियांच्या वृत्तानुसार, जमशेदपूरचे रहिवासी आणि ट्रॅव्हल क्षेत्रातील उद्योजिका मोहिनी मोहन दत्ता यांचेही नाव रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात आहे. टाटा कुटुंबियही या नावामुळे आश्चर्यचकीत झाले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोण आहेत मोहिनी मोहन दत्ता?

मोहिनी मोहन यांच्या कुटुंबियांकडे स्टॅलियन ही ट्रॅव्हल एजन्सी होती. 2013 मध्ये, स्टॅलियनचे ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या ताज सर्व्हिसेसमध्ये विलीनीकरण करण्यात आले. स्टॅलियनमध्ये मोहिनी दत्ता आणि त्यांच्या कुटुंबाची 80 हिस्सेदारी होती. उर्वरित हिस्सा टाटा इंडस्ट्रीजकडे होता. त्यांनी टीसी ट्रॅव्हल सर्व्हिसेसचे संचालक म्हणूनही काम केले आहे. ही कंपनी थॉमस कुकची जुनी सहयोगी कंपनी होती. मोहिनी दत्ता यांच्या दोन मुलींपैकी एकीने 2024 पर्यंत 9 वर्षे टाटा ट्रस्टमध्ये काम केले. याआधी तिने ताज हॉटेल्समध्ये काम केले आहे.

(नक्की वाचा- Repo Rate Cut : रेपो दर म्हणजे नेमकं काय? कर्जाचा EMI किती कमी होणार? )

मोहन दत्ता पहिल्यांदा रतन टाटा यांची भेट

मोहिनी दत्ता स्वतःला टाटा कुटुंबातील सदस्यांच्या जवळचे सांगायचे. ऑक्टोबर 2024 मध्ये रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारावेळी मोहिनी दत्ता यांनी माध्यमांना सांगितले की, ते पहिल्यांदा जमशेदपूरमधील डीलर्स हॉस्टेलमध्ये रतन टाटा यांना भेटले होते. त्यावेळी रतन टाटा 24 वर्षांचे होते. रतन टाटा यांनी त्यांना खूप मदत केली. अशाप्रकारे दोघेही एकमेकांना सुमारे 60 वर्षांपासून ओळखत होते.

(नक्की वाचा-  कामाची बातमी : Loan घेतल्यानंतर मृत्यू झाला तर कर्ज माफ होतं का?)

रतन टाटा यांच्या इच्छेनुसार, 74 वर्षीय मोहिनी दत्ता यांना त्यांच्या उरलेल्या संपत्तीचा एक तृतीयांश हिस्सा मिळेल, ज्यामध्ये 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या बँक ठेवींचा समावेश असेल. याशिवाय महागड्या कार, पेंटिंग्ज, स्टार्टअप्समधील शेअर, महागडी घड्याळे यासारख्या वैयक्तिक वस्तूंचा लिलाव करण्यात येईल. रतन टाटा यांच्या सावत्र बहिणी शिरीन जीजीभॉय आणि डीआना जेजीभॉय यांना उर्वरित दोन तृतीयांश संपत्ती मिळणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Rata Tata, रतन टाटा, Rata Tata Net Worth, Rata Tata News