स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना 2 डिसेंबरला न्यायालयात हजर राहावं लागेल, असा आदेश पुणे सत्र न्यायलयाने दिला आहे. लंडन येथील एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचं म्हटलं जात होतं. याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना 18 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते.
नक्की वाचा - 'राहुल गांधींना चुकीची माहिती दिली', 'त्या' आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांचं धारावीकरांना आवाहन, Video
राहुल गांधी संसदेचे विरोधी पक्षनेते असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते देशभर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते आज न्यायालयात हजर राहू शकत नाहीत, असा अर्ज अॅड. मिलिंद पवार यांनी राहुल गांधी यांच्यावतीने न्यायालयात दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. तसेच, येत्या दोन डिसेंबर रोजी गांधी यांना न्यायालयात हजर राहावे, असा आदेश दिला आहे.
नक्की वाचा - 'सगळ्यात मोठा जोकर, सोंग्या, भोंग्या...', CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जहरी प्रहार
यापूर्वीही राहुल गांधी यांना कोर्टाने समन्स बजावलं आहे. सात्यकी सावरकर यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी गेल्या अनेक वर्षांपासून विविध ठिकाणी वीर सावरकर यांची बदनामी करीत आहेत. ५ मार्च २०२३ मध्ये युकेच्या ओव्हरसीज काँग्रेसच्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी जाणूनबुजून सावरकरांविरोधात खोटे आरोप लावले आहेत. ज्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. नुकतच नाशिकच्या एका कोर्टाने राहुल गांधींना एका वेगळ्या मानहानी प्रकरणात समन्स बजावलं होतं.