जाहिरात
This Article is From Nov 18, 2024

'सगळ्यात मोठा जोकर, सोंग्या, भोंग्या...', CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या सभेत ते बोलत होते. 

'सगळ्यात मोठा जोकर, सोंग्या, भोंग्या...', CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई: 'दोन वर्षात केलेल्या कामाचे आम्हाला समाधान आहे. लोकांच्या चेहऱ्यावरही ते दिसत आहे. म्हणून सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. म्हणून खरी वस्तूस्थिती सांगतो आम्ही केलेल्या कामावर जनता खुश आहे. त्यांनी महायुतीला पुन्हा सत्तेत आणायचे असे ठरवलेलं आहे..', असे म्हणत राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या सभेत ते बोलत होते. 

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे? 

'प्रचाराचा शेवटचा दिवस होता. आम्ही प्रचार करत होतो. मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो. जवळपास 75 सभा घेतल्या. मी पाहिलं की आजपर्यंतच्या इतिहासात कधीही सभांना एवढा प्रतिसाद मिळाला नव्हता इतका दांडगा प्रतिसाद होता.
एक उत्साह होता. अडीच वर्षात महाविकास आघाडीने जे काम केले. विकासकामांना स्टे दिला.अनेक प्रकल्पांना खो घालण्याचे काम केले. आम्ही त्यांना ओपन चॅलेंज दिले, तुम्ही काय केले ते सांगा? होऊन जाऊ द्या समोरासमोर. कारण त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरु केले. वेळेआधी पूर्ण केले,' असा दावा मुख्यमंत्री शिंदेंनी केला. 

'दोन वर्षात केलेल्या कामाचे आम्हाला समाधान आहे. लोकांच्या चेहऱ्यावरही ते दिसत आहे. म्हणून सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. म्हणून खरी वस्तूस्थिती सांगतो आम्ही केलेल्या कामावर जनता खुश आहे. त्यांनी ठरवलेलं आहे महायुतीला पुन्हा सत्तेत आणायचे. त्यामुळे 23 तारखेला बहुमताने महायुती सत्तेत येईल ती काळाजी गरज आहे असं जनतेचे मत आहे. विरोधक भडकावत आहेत, खोट्या गोष्टी पसरवत आहेत. शेतकऱ्यांना आता आम्ही वाऱ्यावर सोडलेले नाही, सोडणार नाही. शेतकऱ्यांना जोडधंदेही सुरु करुन दिले. आजपर्यंत महायुतीने शेतकऱ्यांवर 45,000  कोटी रुपये खर्च केले आहेत,' असंही ते म्हणाले.

नक्की वाचा: 'राग काढू नका, भावनिक होऊ नका...', अजित पवारांची बारामतीकरांना साद, सांगता सभेत काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंवर टीका

'2019 ला त्यांचे आधीच ठरले होते की सरकार काँग्रेससोबत मिळून बनवायचे आणि मुख्यमंत्रीपद मिळवायचं. स्वत:च्या स्वार्थासाठी, स्वत:च्या मोहापायी, खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले. बाळासाहेबांच्या विचारांविरोधात आघाडी केली. जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, मग खरे गद्दार कोण ? आम्हाला हिणवण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? ज्यांनी साधू संतांचा अपमान केला, त्यांना हा अपमान महागात पडेल. सगळ्यात मोठा जोकर कोण आहे महाराष्ट्रात? महाराष्ट्रात सगळ्यात मोठा सोंग्या, भोंग्या भूत कोण आहे? असा खोचक टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला. 

महत्वाची बातमी: 'खरा गद्दार घरात बसलाय', उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन राज ठाकरेंचा थेट हल्ला

Listen to the latest songs, only on JioSaavn.com