3 days ago

भुसावळ येथील नगरपालिकेच्या एका शाळेत पोषण आहारात चक्क किडे आणि अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून संबंधित कंत्राटदारांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेल्या पोषण आहारातील सोयाबीन पुलावामध्ये किडे आणि अळ्या आढळल्या आहेत. यापूर्वीही पोषण आहारात झुरळ, खिळे आढळून आल्याची सांगितलं जात आहे. या सर्व प्रकारामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे पंढरपुरातून आनंदाची बातमी आहे. वसंत पंचमी निमित्त आज पंढरपूरच्या मंदिरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे पंढरपुरात एकच लगीनघाई उडाली आहे. 

Feb 02, 2025 22:36 (IST)

शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर 3 वर्षासाठी निलंबनाची कारवाई

शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोन्ही मल्लांना तीन वर्षासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  रेफरीच्या निषेध बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्र कुस्तिगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी ही घोषणा केली. शिवाराज राक्षे याने पंचांचा निर्णय न पटल्यामुळे त्यांना लाथ मारली होती. शिवाय चुकीचा निर्णय दिल्याचा आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. तर महेंद्र गायकवाड यानेही अंतिम सामन्यानंतर गोंधळ घातल्यामुळे त्याच्यावरही कारवाई केली गेली.  

Feb 02, 2025 20:26 (IST)

IND vs ENG : अखेरच्या T20 सामन्यात अभिषेक शर्माचे दमदार शतक

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अखेरच्या टी ट्वेंटी सामन्यात अभिषेक शर्माने दमदार शतक झळकावलं आहे. त्याने  54 चेंडूत 135 धावा केल्या.  त्याच्या या खेळीत  त्याने 7 चौकार आणि 13 षटकारांची आतशबाजी केली. त्याला आदिल राशीदने बाद केले.   

Feb 02, 2025 19:15 (IST)

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राडा! पैलवान शिवराज राक्षेकडून मारहाण

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामना मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत झाल्यानंतर शिवराज राक्षेने आक्षेप घेत गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. 

Feb 02, 2025 19:00 (IST)

Maharashtra Kesri 2025: महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याला सुरुवात, अजित पवारांची उपस्थिती

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आता सुरुवात झाली असून मॅट विभागातून पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यामध्ये अंतिम फेरीसाठी लढत होत आहे. तर माती विभागात महेंद्र गायकवाड आणि साकेत यादव यांच्यामध्ये लढत होत आहे... 

Advertisement
Feb 02, 2025 18:23 (IST)

Delhi News: निवडणुकांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसची टीम तयार

आगामी काळात होणाऱ्या निवडणुका या मुक्त वातावरणात आणि निष्पक्ष होण्यासाठी काँग्रेसकडून टीम करण्यात आली तयार

निवडणुक आयोगाच्या कामकाजावर टीम लक्ष ठेवणार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी तयार केलेल्या टीमच नाव EAGLE (Empowered Action Group of Leaders and Experts)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्यात झालेल्या घोळाच्या आरोपाची या टिम कडून केला जाणार तपास

महाराष्ट्रातील मतदार यादील फेरफारीचा तपास करत पक्ष नेतृत्वाला सोपवणार अहवाल

महाराष्ट्रातून माजी मंत्री नितीन राऊत यांचा समितीत समावे

Feb 02, 2025 18:05 (IST)

Nandurbar News: धक्कादायक! ताप्ती गंगा ए्क्सप्रेसमध्ये 2 प्रवाशांवर हल्ला

- चेन्नईहून जोधपुर कडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमधील दोन प्रवाशांवर जीवघेणा हल्ला

-  एका प्रवाशाच्या मांडीवर तर दुसऱ्याच्या हातावर धारदार शस्त्राने वार केल्याने प्रवासी जखमी 

- भुसावळ वरून चढलेल्या एका प्रवाशाची दोन राजस्थानी प्रवाशांचा बसण्याच्या जागेवरून झाला होता वाद

- यानंतर नंदुरबार रेल्वे स्टेशनवर उतरल्या त्या प्रवाशाने आपल्या काही सहकारी मित्रांना बोलवत या दोघांवर चाकूने हल्ल्या केल्याची प्राथमिक माहिती दोन्ही जखमी प्रवाशांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले 

- ताप्ती गंगा एक्सप्रेस जोधपुर कडे रवाना

Advertisement
Feb 02, 2025 16:58 (IST)

Mumbai News: मुंबई विमानतळावर 16.49 कोटींचे कोकेन जप्त; 1 जण अटकेत

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळ, मुंबई येथील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अंदाजे रुपये किमतीचे एकूण 1.649 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त केले. 16.49 कोटी. 27 जानेवारी 2025 च्या रात्री, प्रोफाइलिंग आणि विशिष्ट गुप्तचरांवर कारवाई करून, कस्टम अधिका-यांनी पॅरिस मार्गे साओ पाउलो (ब्राझील) येथून मुंबईत येणाऱ्या एका प्रवाशाला रोखले. 5 दिवसांच्या ऑपरेशन दरम्यान, अधिकाऱ्यांनी कोकेन असल्याचा संशय असलेल्या पांढऱ्या, चुरा झालेल्या पदार्थासह 170 कॅप्सूल जप्त केले. हा पदार्थ प्रवाशाच्या शरीरातील पोकळीत आत टाकण्यात आला होता तसेच लपविला होता. आरोपी प्रवाशाला नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, 1985 अंतर्गत अटक करण्यात आली.

Feb 02, 2025 16:49 (IST)

Ulhasnagar News: उल्हासनगरात महेश गायकवाड यांचा डीसीपी ऑफिसवर मूक मोर्चा

उल्हासनगरात पोलीस ठाण्यात गोळीबार झालेले महेश गायकवाड यांनी आज उल्हासनगरच्या डीसीपी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. गोळीबाराच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होऊनही गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा अजूनही फरार असल्यामुळे महेश गायकवाड यांनी समर्थकांसह हा मोर्चा काढला.

Advertisement
Feb 02, 2025 16:48 (IST)

Nashik Accident: नाशिकमध्ये खाजगी बस उलटून 1 महिला ठार, 30 जखमी

नाशिकच्या हरसूल पोलिस ठाणे हद्दीत  खरपडी घाटामध्ये मध्यप्रदेश रिवा येथील भाविक त्र्यंबकेश्वर येथील दर्शन आटपून खासगी लक्झरी बसने  गुजरात येथे जात असताना बस पलटी होऊन अपघातात  एक 62 वर्षीय ठार झाली असून  बस मधील अन्य 30 प्रवाशी जखमी झाले आहेत त्यांना  उपचारा करिता  ग्रामीण रुग्णालय हरसुल येथे दाखल करण्यात आले आहे.

घटना रात्री उशिरा घडल्याने जखमी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले  यावेळी हर्सूल पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी ,कर्मचाऱ्यांनी सर्वांना तातडीची मदत करून परिसरातील दवाखान्यात दाखल केली. या घटनेविषयी अधिक तपास हर्सूल पोलीस अधिकारी करीत आहेत

Feb 02, 2025 16:46 (IST)

Live Updates: मंञीपद न मिळाल्याने आमदार विक्रम काळे यांची खदखद कायम

मी 4 वेळा विधान परिषदेवर निवडुन गेलोय,मी सिनियर असुन देखील आम्हाला सोडून तरुण असणारे संजय बनसोडे यांना मंत्री म्हणुन संधी मिळाली,या वेळेस देखील बाबासाहेब पाटील यांना मंत्री म्हणुन संधी मिळाली आहे, मी त्यांना अगोदरच शुभेच्छा दिल्यात, असे म्हणत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी मंत्रीपदी संधी न मिळाल्याची खदखद पुन्हा एकदा बोलुन दाखवली आहे. पळसप येथे १० व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समोरच विक्रम काळे यांनी आपल्या मंञीपद न मिळाल्याची खदखद पुन्हा एखदा बोलुन दाखवली आहे. 

Feb 02, 2025 16:42 (IST)

Sangli News: सांगली जिल्ह्यातील ड्रग्जबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील आक्रमक

सांगली जिल्ह्यातील ड्रग्ज बाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील आक्रमक 

ड्रग कारवाईसाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन 

दर आठवड्याला ड्रग कारवाईबाबतच्या समितीची बैठक होणार 

ड्रग्ज करवायचं स्वरूप व्यापक करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आदेश 

अनेक वर्ष पोलीस ठाण्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचेही आदेश 

ड्रग कारवाईत कोणीही हस्तक्षेप केल्यास खपवून घेतला जाणार नाही 

सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा इशारा

Feb 02, 2025 12:12 (IST)

Live Update : वसंत पंचमीनिमित्त पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठलाचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न

वसंत पंचमीनिमित्त पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठलाचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न झाला. पंढरपुरात वाजत गाजत...सोन्याचं बाशिंग, लगीन देवाचं लागलं..., अशा गजरात देवाचं लग्न लागलं. यावेळी हजारोंच्या संख्येने मंदिरात आणि मंदिराबाहेर भक्तांनी गर्दी केली होती. 

अनुराधादीदी शेटे यांची रुक्मिणी स्वयंवर कथा झाल्यावर साधारण पावणे बाराच्या सुमारास भाविकांना अक्षता वाटप करण्यात आले आणि त्यानंतर विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची उत्सव मूर्ती समोरासमोर आणून आंतरपाठ धरून शुभमंगल सावधानच्या गजरात विवाह संपन्न झाला. यावेळी देवाच्या लग्नाच्या आनंदात भाविक हे मोठ्या संख्येने भक्तीगीतांवर नाचताना, फुगड्या खेळताना दिसून आले. एक स्वर्गीय सुखाचा विवाह सोहळा पंढरपुरात भाविकांना अनुभवता आला. या विवाह सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.  वसंत पंचमी पासून आता पुढील एक महिना विठोबास पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात येतो आहे.

Feb 02, 2025 11:55 (IST)

Live Update : विठ्ठल-रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याला काही क्षणात होणार सुरुवात

विवाह सोहळ्याला काही क्षणात होणार सुरुवात 

विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्ती आणल्या जाणारा विवाह मंडपात...

शुभमंगल सावधा चा गजर करत विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींवर होणार अक्षतांची बरसात 

विठ्ठल रुक्मिणीचा होणार काही क्षणात विवाह सोहळा

Feb 02, 2025 10:14 (IST)

Live Update : देशमुख कुटुंब भगवानगडाकडे निघाले, महंत नामदेव शास्त्री यांची घेणार भेट

धनंजय देशमुख मसाजोग गावातून भगवान गडावर जाण्यासाठी निघाले आहेत. महंत नामदेव शास्त्री यांना सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील काही पुरावे धनंजय देशमुख सादर करणार आहेत. धनंजय देशमुख यांच्यासोबत दिवंगत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि त्यांचा मुलगा देखील भगवानगडावर निघाले आहेत. साधारण अकरा वाजता देशमुख कुटुंब भगवानगडावर दाखल होईल.. महंत शास्त्री यांनी केलेल्या विधानाचा देशमुख कुटुंबाला त्रास झाल्याची खंत देखील धनंजय देशमुख यांनी बोलावून दाखवली होती.

Feb 02, 2025 09:43 (IST)

Live Update : अर्थसंकल्पात साखरेसाठी अपेक्षित तरतूद नाही, साखर उद्योजकांमध्ये निराशा

गेली तीन-चार वर्षे साखर उद्योग आर्थिक आव्हानांना तोंड देत आलेला आहे.  2019 पासून उसाची एफआरपी पाच वेळा वाढवण्यात आली. पण साखरेच्या एमएसपीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. पगार, स्पेअर पार्टस, केमिकल्स, वंगण तेले यांच्या किमतीही पाच वर्षांत फारच वाढल्या आहेत. इतकं असूनही साखरे दर जैसे थे आहेत. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये साखर उद्योगासाठी काय तरतुदी होतील याकडे उद्योजकांच लक्ष होत. केंद्रीय अर्थसंकल्पात निर्णय, तरतुदी झाल्या तर आर्थिक अडचणीतील साखर उद्येागाला दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. पण याविषयी शासनाने कोणत्याही तरतुदी केल्या नाहीत त्यामुळं साखर उद्योगामध्ये याविषयी निराशा आहे. 

Feb 02, 2025 09:40 (IST)

Live Update : नाशिक - गुजरात महामार्गावर सापुतारा घाटात खासगी लक्झरी बसला भीषण अपघात, 7 प्रवाशांचा मृत्यू

नाशिक - गुजरात महामार्गावर सापुतारा घाटात खासगी लक्झरी बसला भीषण अपघात

- अपघातात 7 जण जागीच ठार तर 15 जण जख़मी, काहींची प्रकृती चिंताजनक

- पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडला अपघात 

- बस थेट 200 फूट दरीत कोसळली, बसचे झाले तुकडे

- नाशिकहून देवदर्शन करून गुजरात कडे देवदर्शनासाठी भाविक जात असताना झाला अपघात

- बस मधील सर्व मयत आणि जखमी मध्य प्रदेश मधील असल्याची प्राथमिक माहिती

Feb 02, 2025 08:48 (IST)

Live Update : मंगरूळपीरच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शंकर महादेवन यांचे गायन प्रशिक्षण

वाशिमच्या मंगरूळपीर येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी विशेष गायन प्रशिक्षण सुरू केले आहे. शंकर महादेवन अकॅडमीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, दर गुरुवारी ऑनलाइन पद्धतीने शंकर महादेवन हे विद्यार्थ्यांना गायनाचे धडे देणार आहेत.

हा उपक्रम संपूर्ण देशभरातील केवळ तीन शाळांसाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून निवडला गेला असून, त्यामध्ये मंगरूळपीरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा समावेश झाल्याने शाळेने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शास्त्रीय आणि आधुनिक संगीतातील मूलभूत तसेच प्रगत तंत्रांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. या प्रशिक्षण उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. ऑनलाइन उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे या उपक्रमाला अधिक पाठबळ मिळालं आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम संगीतातील कारकीर्द घडवण्यासाठी मदत करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Feb 02, 2025 07:39 (IST)

Live Update : एक रूपयात पीक विमा योजनेत घोटाळा

राज्य सरकारने प्रचंड गाजावाजा करत सुरू केलेल्या एक रूपयात पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. सातारा जिल्ह्यातील 18 हजार 755 कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कांद्याची लागवड न करता पीक विम्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. विमा कंपन्यांनीही नुकसानीची खातरजमा न करता प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कृषी विभागाने केलेल्या पडताळणीत हा प्रकार समोर आला असून विमा कंपनीच्या घशात जाणारे 5.5 कोटी वाचले आहेत.

Feb 02, 2025 07:37 (IST)

Live Update : प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळले

वज्रेश्वरी-वसई मार्गावर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना घडली तेव्हा या बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. एसटी बसचे पुढचे चाक निखळल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अशावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटण्याची भीती असते. मात्र, चालकाने प्रसंगावधान दाखवत तातडीने बस थांबवत सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. या संपूर्ण घटनेचा थरार एका सीसीटीवी कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेनंतर प्रवाशांनी एसटी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जुन्या व धोकादायक बस हटवून नव्या आणि सुरक्षित बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Feb 02, 2025 07:35 (IST)

Live Update : जळगावमध्ये एका 45 वर्षीय महिलेला जीबीएस आजाराची लागण

जळगावमध्ये एका 45 वर्षीय महिलेला जीबीएस आजाराची लागण झाली असून या महिलेवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जीबीएस आजाराची लागण झालेल्या रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या अधिकाऱ्यांची गुलाबराव पाटलांनी चर्चा करत आढावा घेतला. दरम्यान सदर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली असून नागरिकांनीही काळजी घेण्याची आवाहन गुलाबराव पाटलांनी केले आहे. 

Feb 02, 2025 07:34 (IST)

Live Update : पोषण आहारात चक्क किडे आणि अळ्या

भुसावळ येथील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 35 मध्ये पोषण आहारात चक्क किडे आणि अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला असून संबंधित कंत्राटदार यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेल्या पोषण आहारातील सोयाबीन पुलावमध्ये किडे आणि अळ्या आढळल्या आहेत. यापूर्वीही पोषण आहारात झुरळ, खिळे आढळून आल्याची धक्कादायक माहिती शाळेच्या मुख्याध्यापिकांनी दिली असून मात्र याबाबत संबंधित कंत्राटदार समूहाला समज देवूनही पुन्हा सोयाबीन पुलावमध्ये किडे आणि अळ्या निघाल्याची माहिती मुख्याध्यापिकांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पालकांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे