2 months ago

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज  सकाळी 9 वाजता मनसेची शिवतीर्थ येथे बैठक होणार आहे. मुंबईतील शाखाध्यक्ष आणि उपशाखाध्यक्ष यांच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या मनसेच्या केंद्रीय समितीसोबत राज ठाकरे यांची चर्चा होणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचं बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. 

Jun 16, 2025 14:56 (IST)

Live Update : संगमेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे लँडस्लाईड, धामणी गोळवलीतील डोंगराचा काही भाग कोसळला

धामणीत रात्री तीन तासांत पडला मुसळधार पाऊस

पावसामुळे डोंगराचा काही भाग आला खाली

डोंगराखाली असलेली विहीर मातीमुळे गेली भरुन

डोंगराखाली असलेल्या पोफळीच्या बागेचं देखील मोठं नुकसान

सुदैवाने कोणीतही जीवितहानी नाही

Jun 16, 2025 14:55 (IST)

Live Update : मनमाड बाजार समिती कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, 3 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचारी संतप्त

सभापतींच्या आडमुठे धोरणामुळे तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याचा आरोप करून मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले. वेतन रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांची उपासमार होत असल्याने  कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त केला. व तातडीने वेतन अदा करण्याची मागणी केली.दरम्यान आंदोलनामुळे  मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  कांद्यासह शेतमालाचा लिलाव ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना गैरसोय झाली होती..

Jun 16, 2025 13:21 (IST)

Live Update : मुंबई मेट्रो 1 मार्गावर तांत्रिक बिघाड, घाटकोपरहून वर्सोवाला जाणाऱ्या मेट्रो रखडल्या..

मुंबई मेट्रो 1 मार्गावर तांत्रिक बिघाड, घाटकोपरहून वर्सोवाला जाणाऱ्या मेट्रो रखडल्या..

Jun 16, 2025 13:14 (IST)

Live Update : सिंधुदुर्ग कोल्हापूर करूळ घाट वाहतुकीस ठप्प

सिंधुदुर्ग कोल्हापूर करूळ घाट वाहतुकीस ठप्प

करूळ घाटात मातीचा मलबा व दरड आल्याने घाटातील वाहतूक ठप्प 

सकाळी साडेदहा वाजता  तिचा मलबा आणि दरड ही रस्त्यावर आली

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

दोन तासापासून वाहतूक खोळंबली आहे 

महामार्ग प्राधिकरणाकडून मलबा हटवण्याचे काम सुरू आहे

Advertisement
Jun 16, 2025 12:35 (IST)

Live Update : पावसामुळे कोथरूड येथील सीतान्नपुर्णा सोसायटीच्या पार्किंगमध्ये साचलं पाणी

पावसामुळे कोथरूड येथील सीतान्नपुर्णा सोसायटीच्या पार्किंगमध्ये साचलं पाणी

सोसायटी धारकांची मोठी गैरसोय.

सोसायटी लगतच्या दुकानांनाही ड्रेनेजच्या पाण्याचा फटका

ड्रेनेज लाईन तुंबल्याने देणे सर्व ड्रेनजचे पाणी सोसायटीमध्ये

पालिकेने वेळेत कामे न केल्याचा आरोप

पालिकेकडून पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू

Jun 16, 2025 11:46 (IST)

Live Update : पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करुळ घाटामध्ये कोसळली दरड...

पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करुळ घाटामध्ये कोसळली दरड...

करूळ घाटामध्ये मातीचा मलबा आणि दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प...

सिंधुदुर्गातून कोल्हापूर कडे जाणारे वाहतूक ठप्प...

पावसाचा फटका करूळ घाटाला बसला..

करूळ घाटातून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली...

Advertisement
Jun 16, 2025 11:39 (IST)

Live Update : माणगाव ते रायगड मार्गावर दरड कोसळली

माणगावहून रायगडकडे जाणाऱ्या मार्गावर दरड रस्त्यावर आली आहे. पळसगाव ते घरोशी दरम्यान आज सकाळची ही घटना आहे. दरडी मुळे वाहतुकीला कुठलाही अडथळा आलेला नाही . 

रस्त्यावर आलेले दगड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. मात्र डोंगरापासून सैल झालेले आणखी दगडाचे तुकडे रस्त्यावर येण्याची शक्यता आहे.  नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

Jun 16, 2025 10:09 (IST)

Live Update : लोणावळ्यामधील भुशी धरण ओव्हरफ्लो, गेल्या 24 तासात 143 मिलिमीटर पावसाची नोंद

लोणावळ्यामधील भुशी धरण ओव्हरफ्लो झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अखेर भुशी धरण 100 टक्के भरले आहे. दरवर्षी पर्यटकांना भुशी धरण भरण्याची आतुरता असते. यावर्षी मान्सून वेळेआधीच दाखल झाल्याने अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. लोणावळ्यामध्ये देखील गेल्या 24 तासात 143  मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Advertisement
Jun 16, 2025 09:50 (IST)

Live Update : मुंबई गोवा महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका

 मुंबई गोवा महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका

पावसाने उघड केला मुंबई-गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाचा दर्जा

लांजा तालुक्यातील वाकेड घाटात संरक्षक भिंतीसह दरड कोसळली

सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारासची घटना

महामार्गावरची वाहतुक एका लेथवरून सुरु

महामार्गावर कोसळलेली दरड बाजूला करण्यासाठीचे प्रयत्न सुरु

महामार्गावरची यंत्रणा वाकेड घाटात दाखल, वाहतुकीवर मोठा परिणाम नाही

Jun 16, 2025 09:41 (IST)

Live Update : पुण्यातील कोथरूड परिसरात अपघात, 2 जण जखमी

पुण्यातील कोथरूड परिसरात अपघात 

कोथरूड परिसरात असणाऱ्या वेद भवन येथील पुलावर ३ ते ४ वाहनांचा अपघात 

भरधाव येणारी वाहन एकमेकांना धडकली 

अपघातात दोन जण जखमी 

जखमींना जवळच्या रुग्णालयात केलं दाखल सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी नाही 

अग्निशमन दलाकडून वेळेत अपघात स्थळी पोहोचत  स्थिती नियंत्रणात

Jun 16, 2025 09:02 (IST)

Live Update : येत्या दोन दिवसांत नागपुरात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अलर्ट

येत्या दोन दिवसांत नागपुरात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अलर्ट 

* हवामान विभागाच्या अंदाजानुसार १७ ते २१ जून दरम्यान नागपुरात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

* तर पुढील २४ तासात विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागात मान्सूनचे ढग पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज..

* जून महिन्यात नागपूरात उष्णतेचा खूप त्रास होतोय, या महिन्यात पारा ४४.२ अंशावर पोहचला होता.. तर नवतापादरम्यान नागपूरात एकदाही पारा ४० अंशाचा टप्पा ओलांडू शकला नाही..

Jun 16, 2025 07:39 (IST)

Live Update : जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू

जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू

धरण परिसरात झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक सुरू

जायकवाडी धरणात 379 क्युसेक ने पाण्याची आवक सुरू 

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 29.83 टक्के 

गेल्यावर्षी जायकवाडीत आजच्या दिवशी 5.47 टक्के पाणीसाठा शिल्लक होता