VIDEO: “माझ्याकडे फक्त 3 पर्याय होते.." राघव चढ्ढांचं मोठं वक्तव्य; भाजपा प्रवेशाचं कारणं सांगितलं

राघव चड्ढा यांनी भाजपवर केलेल्या जुन्या टिकांचे व्हिडिओ व्हायरल करत जोरदार ट्रोल केलं जात आहे. यावरुनच राघव चड्ढा यांनी पहिल्यांदाच व्हिडिओ पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Raghav Chadha Video On Joining BJP:  आम आदमी पक्षाचे राघव चड्ढा यांनी आपला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याने देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राघव चड्ढा यांच्यासह आपचे सात खासदार फुटले असून पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. दुसरीकडे आप सोडल्यानंतर राघव चड्ढा यांनी भाजपवर केलेल्या जुन्या टिकांचे व्हिडिओ व्हायरल करत जोरदार ट्रोल केलं जात आहे. यावरुनच राघव चड्ढा यांनी पहिल्यांदाच व्हिडिओ पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे.

Mumbai News: घर, कलिंगड, बिर्याणी.. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; मुंबई हादरली, नेमकं काय घडलं?

काय म्हणाले राघव चड्ढा?

  "राजकारणात येण्यापूर्वी ते एक चार्टर्ड अकाउंटंट होतो ते सोडून मी राजकारणात आलो.  राजकारणात मी काही मिळवायला आलेलो नाही. मी एका राजकीय पक्षाचा (आप) संस्थापक सदस्य झालो. मी गेल्या १५ वर्षांपासून माझ्या कठोर परिश्रमाने पक्षाचे काम केले. मात्र आप आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. हा पक्ष आता काही भ्रष्ट आणि तडजोड केलेल्या व्यक्तींचा पक्ष बनला आहे, ज्यांचे ध्येय राष्ट्राची सेवा करणे नसून स्वतःचे वैयक्तिक स्वार्थ साधणे आहे, अशी टीका राघव चड्ढा यांनी केली. 

तसेच "वर्षानुवर्षे मला असे वाटत होते की मी चुकीच्या पक्षात योग्य व्यक्ती आहे. मला पक्षात काम करण्यापासून रोखले जात होते. हे सर्व पाहिल्यानंतर त्यांच्यासमोर तीन पर्याय होते. एक, मी राजकारण सोडावे; दुसरे, मी याच पक्षात राहून गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करावा; आणि तिसरे, मी माझा अनुभव आणि ऊर्जा घेऊन दुसऱ्या राजकीय पक्षात सामील होऊन सकारात्मक राजकारणात सहभागी व्हावे. त्यानंतर आम्ही सर्वांनी हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असं त्यांनी स्पष्ट केले. 

Advertisement

राघव चड्ढा पुढे म्हणाले की, केवळ एक, दोन किंवा तीन नव्हे, तर सात खासदारांनी मिळून 'आप' सोडण्याचा निर्णय घेतला.  एक व्यक्ती चुकू शकते, दोन व्यक्ती चुकू शकतात, पण सात जण चुकू शकत नाहीत... म्हणून आम्ही सर्वांनी एका नवीन राजकीय पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला.  जर तुमच्या कामाचे वातावरण दूषित झाले तर तुम्हाला काम करणे खूप कठीण होईल. अशा वेळी तुम्हाला योग्य निर्णय घेऊन पक्ष सोडावा लागेल. दरम्यान, मी पूर्वीप्रमाणेच संसदेत तुमचे प्रश्न मांडत राहीन, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. 

une News: पुण्यातील नामांकित लॉ कॉलेजमध्ये रॅगिंग! 5 विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा, तरुणासोबत भयंकर प्रकार