जाहिरात

Mumbai News: घर, कलिंगड, बिर्याणी.. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; मुंबई हादरली, नेमकं काय घडलं?

विशेष म्हणजे, मृत्यू पावलेल्या कुटुंबाने रात्रीच्या जेवणात बिर्याणी खाल्ल्यानंतर टरबूज खाल्ले  होते, अशी माहिती समोर येत आहे.

Mumbai News: घर, कलिंगड, बिर्याणी.. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; मुंबई हादरली, नेमकं काय घडलं?

ऋतिक गणकवार, मुंबई:

Mumbai Food Poisoning Death:  मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या कुटुंबाने बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ले होते. अन्नातून विषबाधा झाल्याने ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याबाबतचा अधिक तपास सुरु असून परिसराच भितीचे वातावरण पसरले आहे. 

Pune Railway: आता गर्दीची चिंता मिटली! पुणे स्टेशनचा होणार कायापालट, नवीन 6 आयलँड प्लॅटफॉर्मचं बांधकाम सुरू

एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, मुंबईत खळबळ 

समोर आलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा प्रकार अन्न विषबाधेचा (Food Poisoning) असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मृत्यू पावलेल्या कुटुंबाने रात्रीच्या जेवणात बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ले  होते, अशी माहिती समोर येत आहे.

​अब्दुल्ला डोकाडिया (४०), नसरीन डोकाडिया (३५), आयेशा (१६) आणि झैनब (१३) अशी मृतांची नावे आहेत. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या कुटुंबाची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान या चौघांचाही मृत्यू झाला. पोलिसांना दिलेल्या जबाबात कुटुंबातील एका सदस्याने नमूद केले होते की, मृत्यूपूर्वी त्यांनी रात्री बिर्याणी खाल्ली होती आणि त्यानंतर कलिंगड खाल्ले होते.

​या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नेमके जेवणातील कोणत्या पदार्थामुळे विषबाधा झाली, याचा तपास पोलीस करत आहेत. "शवविच्छेदन अहवाल (Post-mortem report) प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके तांत्रिक कारण स्पष्ट होईल," असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अन्न नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pune News: पुण्यातील नामांकित लॉ कॉलेजमध्ये रॅगिंग! 5 विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा, तरुणासोबत भयंकर प्रकार

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com