Rahul Gandhi Defamation Case : स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकरणात मोठा दिलासा; कोर्टाने राहुल गांधींची याचिका स्वीकारली!

Rahul Gandhi Defamation Case : राहुल गांधींनी लंडनमधील  आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावकरकरांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचा हवाला देत त्यांच्यावर काही टिप्पणी केली होती.  

जाहिरात
Read Time: 2 mins

Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावकरकरांबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त विधानामुळे झालेल्या मानहानी प्रकरण काँग्रेस नेता राहुल गांधी यांना दिलासा मिळाला आहे. कोर्टाने मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी करताना राहुल गांधींना दिलासा दिला आहे. सावरकरांच्या पुस्तकाचा उल्लेख करीत त्यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर सावकरकरांच्या नातेवाईकानी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल केला होता. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांची बाजू मांडणारे वकील मिलिंद पवार यांनी गेल्या महिन्यात न्यायालयासमोर याचिका दाखल केली होती.  ज्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हजर राहण्यापासून कायमची सूट देण्याची विनंती करण्यात आली होती. खासदार-आमदार न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी (प्रथमवर्ग) अमोल शिंदे यांनी आपल्या आदेशात म्हटलं, आरोपी हा लोकसभेतील विरोधी पक्षनेता असून त्याला अनेक सभांना हजेरी लावावी लागते. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी कायमची सूट देण्यात आली आहे. 

नक्की वाचा - J. Jayalalithaa : 27 KG सोनं, 1116 KG चांदी... जयललिता यांची संपत्ती तमिळनाडू सरकारच्या तिजोरीत, यादी पाहून डोळे विस्फारतील!

Advertisement

न्यायालयाने आदेशात काय सांगितलं? 
राहुल गांधींना 'झेड-प्लस' दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. हे लक्षात घेऊन कोर्टाने आदेशात म्हटलं की, पुणे यात्रेदरम्यान सुरक्षेवर झालेला खर्च आणि नियमित सुनावणीला उपस्थित राहिल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता राहुल गांधी यांना खटल्यासाठी न्यायालयात हजर राहण्यापासून कायमची सूट देण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?
राहुल गांधींविरोधात ही तक्रार मार्च 2023 मध्ये करण्यात आली होती. राहुल गांधींनी लंडनमधील  आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावकरकरांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचा हवाला देत त्यांच्यावर काही टिप्पणी केली होती.  

Advertisement