(फाइल फोटो)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील पहिल्या वंदे मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्याआधी रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. वंदे मेट्रोचे नाव बदलण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. वंदे मेट्रो ट्रेन आता नमो भारत रॅपिड रेल नावाने ओळखली जाणार आहे.
गुजरातमध्ये आज पहिल्या नमो भारत रॅपिड रेल्वेची भेट मिळणार आहे. ही ट्रेन गुजरातमधील भुज ते अहमदाबादपर्यंत धावणार आहे. नमो भारत रॅपिड मेट्रोचे किमान भाडे 30 रुपये आहे. यामध्ये जीएसटीचाही समावेश आहे. यासोबतच नमो भारत रॅपिड मेट्रोमध्ये सीझन तिकीटही उपलब्ध आहे.