Wedding news: 'या' गावातल्या मुलांचं होत नाही लग्न, मुली देतात थेट नकार, काय आहे कारण?

या गावाचं नाव जरी घेतलं तरी मुली थेट आपला नकार कळवतात. त्यामुळे या गावातल्या मुलांना लग्नाची आजही प्रतिक्षा आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

देशभरात सध्या लग्नाची धूम सुरू आहे. अनेक जोडपी विवाह बंधनात अडकत आहेत. देशातील कुठल्या ना कुठल्या शहर  गावात सध्या लग्नाची तयारी सुरू असल्याचं दिसून येत आहेत. लग्न हा आयुष्यातला महत्वाचा क्षण आहे. लग्न व्हावं हे प्रत्येकालाच वाटत असतं. पण देशातील असं एक गाव आहे, त्या गावाच्या नशिबात लग्न सोहळा पाहणं नाही. या गावातल्या मुलांची लग्नच ठरत नाहीत. या गावाचं नाव जरी घेतलं तरी मुली थेट आपला नकार कळवतात. त्यामुळे या गावातल्या मुलांना लग्नाची आजही प्रतिक्षा आहे. त्यामुळे हे गाव आजही सनई चौघडे वाजण्याच्या प्रतिक्षेत आहे.    

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हे गाव राजस्थानमध्ये आहे. कोटा जिल्ह्यातील कोलीपुरा असं या गावाचं नाव आहे. हे गाव विकासापासून खूप दुर आहे. गावात मुलभूत सुविधांची वानवा आहे. या गावात अजूनही वीज नाही. शिवाय मोबाईल नेटवर्क ही नाही. त्यामुळे मोबाईलही यागावात चालत नाही. मुकुंदरा टायगर आरक्षित भागात हे कोलीपुरा गाव आहे. टायगर रिझर्व असल्याने इथं विकासाच्या अडचणी येत आहेत. शिवाय वन विभाग ही विकासासाठी आवश्यक परवानग्या देत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही या गावात अजूनही वीज आलेली नाही. मोबाईलचं नेटवर्कही नाही. शिवाय या गावात गावकरी घरांचे पक्के बांधकामही करू शकत नाही. या गावाल येत्या काही काळात दुसऱ्या ठिकाणी हलवले जाणार आहे.   

ट्रेंडिंग बातमी - Walmik Karad : बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गित्तेच्या पत्नीचे धक्कादायक खुलासे

या कारणा मुळे डिजिटल युगात मुलांच्या शिक्षणापासून गावातल्या तरुणांच्या लग्नापर्यंत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यागावातले लोक जर कुठे मुलांच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले तर त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला जातो. आमची मुलगी लाईट नसेल तर अशा गावात कशी राहाणार. मोबाईलला नेटवर्क नसेल तर ती आमच्याशी कशी संपर्क साधणार. अशा स्थिती ती कशा राहू शकते अशी उलट विचारणा केली जाते. त्याच बरोबर यागावात या लोकांचे नातेवाईकही या कारणामुळे येणं टाळत आहेत. अशा स्थितीत ही हे गाव आजही आपलं जिवन जगत आहे. हा त्यांच्या जगण्याचा एक भाग झाला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांची भेट, मंत्रिमंडळ बैठक अर्ध्यावर सोडली अन् राजीनाम्याच्या चर्चेवर म्हणाले...

सध्याचं युग हे डिजिटलचं युग म्हणून ओळखंलं जातं. टुजी, फोरजी नंतर आता 5G चा जमाना आहे. असं असताना कोलीपुरा गावात याचा मागमुसही नाही. जवळपास 500 पेक्षा जास्त घरं या गावात आहेत. विशेष म्हणजे या गावात मोबाईल फोन तर सर्वांकडे आहेत. पण त्याला नेटवर्कच नसतं. काही तरी जुगाड करून त्यांना नेटवर्क मिळवता येतं. पण ते सर्वांनाच शक्य होत नाही. त्यामुळे आहे त्या स्थितीत हे लोक जिवन जगत आहेत.   

Advertisement