जाहिरात
20 days ago

आज 26 जानेवारी 2025 रोजी आपण आपल्या देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. यानिमित्ताने देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दिल्लीतील कर्तव्यपथावर विविध परदेशी पाहुणे, पंतप्रधानांच्या उपस्थितीत पथसंचलनाचं करण्यात येईल. यंदा पथसंचलनात भारतीय वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबिआंत प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले आहेत. 

Pune Nashik Road Accident: पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात, पती पत्नीचा मृत्यू

पुणे नाशिक महामार्गावर असणाऱ्या घारगाव येथे रस्त्यात उभ्या असणाऱ्या ट्रक ला मारुती सियाज गाडीने पाठीमागून धडक दिली... यात पती पत्नी दोघांचा मृत्यू झाला आहे तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.रात्रीच्या अंधारात उभा असलेला हा ट्रक न दिसल्याने अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणणे आहे.पुणे येथे रहात असलेले दरेकर कुटुंबीय पुण्याहून नाशिकला एका विवाहासाठी निघाले होते.यावेळी माळवाडी परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला ही कार धडकली यातील सचिन दरेकर (वय 57 वर्षे) सौ रमा सचिन दरेकर 53 वर्षीय या दोघा दांमपत्याचा यात मृत्यू झाला आहे.

Dharashiv Crime : 1 महिला अन् 2 पुरुष... तीन मृतदेह सापडल्याने धाराशिवमध्ये खळबळ

तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव च्या पुलाखाली आढळले तीन मृतदेह

1  महिला व 2 पुरुषाचे मृतदेह आढळल्याने खळबळ

मृतदेह पोलिसांनी वर काढले तपास सुरू

दोन दिवसांपूर्वी पाण्यात पडल्याचा पोलिसांचा अंदाज

घातपात की अपघात याचा पोलीस तपास सुरू

पुरुषाचा मृतदेह बाहेर काढला ओळख पटली आनंदनगर मुरूम येथील पुरुष रहिवासी

तर महिलांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू

सोलापूर हैदराबाद महामार्ग क्रमांक 65 वर बाबळगाव गावाजवळील घटना

Maharashtra Politics: ठाणे महानगरपालिका आपलीच: उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश

शिवसेना ठाकरे गटाची ठाणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने  उद्धव ठाकरेंनी घेतली पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक: 

 शिंदेंच्या बालेकिल्ल्यात महापालिका निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून ठाकरेंची रणनीती: ठाणे महापालिका आपलीच आहे आणि आपलीच राहणार, याचा विचार करून आतापासून तयारीला लागा ! उद्धव ठाकरेंनी दिल्या पदाधिकाऱ्यांना सूचना

उद्धव ठाकरे यांनी आता मुंबईनंतर ठाणे महापालिकेकडे विशेष लक्ष देत आढावा बैठक आज घेतली. यामध्ये राजन विचारे केदार दिघे ठाण्यातील पदाधिकारी उपस्थित होते. लवकरच ठाणे महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी निरीक्षक नेमून ठाण्यात विविध ठिकाणी बैठका घेऊन संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जाणार आहेत.  ठाणे महापालिकेत सुद्धा शिवसेना ठाकरे स्वबळावर निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची इच्छा आहे मात्र कशा प्रकारची तयारी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  बीडच्या विशेष मकोका न्यायालयाचा निर्णय.  डिजिटल एव्हिडन्स प्राप्त झाल्याने बीडच्या न्यायालयात झाला युक्तिवाद.  सुदर्शन घुले आता न्यायालयीन कोठडीतून पुन्हा एसआयटी कोठडीत... 

Beed Crime: बीड मधील गुन्हेगारांचे सिंडिकेट उध्वस्त होणार, एका महिन्यात दोन टोळ्यावर मकोकाची कारवाई

बीड मधील गुन्हेगारांचे सिंडिकेट उध्वस्त करण्यासाठी आता पोलीस ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे सुदर्शन घुले गॅंगवर मकोकानुसार कारवाई केल्यानंतर आता महिनाभराच्या आतच आठवले गॅंगवर देखील अशाच पद्धतीने मोको का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे आठवले गॅंग मधील सहा जणांचा यात समावेश आहे..

अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर, प्रसाद धीवर, ओंकार सवाई या सहा आरोपीचा समावेश यामध्ये आहे.. यातील सनी आठवले आणि आशिष आठवले हे फरार आहेत.. बीड मधील या आठवले  गॅंगवर गंभीर स्वरूपाचे 19  गुन्हे दाखल आहेत.

Indapur Accident: नीरा- मोरगाव रस्त्यावर अपघात, तरुणी जखमी

पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या नीरा मोरगाव रस्त्यावर नीरा येथील दगडेवस्ती  येथे रस्त्यावर सांडपाणी सोडण्यात आलेले आहे... गटाराचे चेंबर जाम झाल्याने हे पाणी रस्त्यावर येतेय.... त्यामुळे या मार्गावर अपघात होत आहेत..सांडपाण्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये मोटरसायकललां अपघात होऊन आज सकाळी शालेय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली...

ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय.तर या सांडपाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप धायगुडे यांनी दिलाय...

Beed News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी 

बीडच्या विशेष मकोका न्यायालयाचा निर्णय 

डिजिटल एव्हिडन्स प्राप्त झाल्याने बीडच्या न्यायालयात झाला युक्तिवाद

सुदर्शन घुले आता न्यायालयीन कोठडीतून पुन्हा एसआयटी कोठडीत

Maratha Reservation: अंतरवालीत आमरण उपोषणा दरम्यान 2 आंदोलकांची प्रकृती खालावली

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मंदाकिनी बारकुल व सुभाष खाडे या उपोषण कर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावलीय उपोषणा दरम्यान महिलेला चक्कर आल्याने त्या खाली पडल्या आहेत तर खाडे हे ही तीन दिवसापासून उपोषण करत असल्याने त्यांची प्रकृती खालावल्याने ते बेशुद्ध पडल्याने त्यांना आंदोलन स्थळी असलेल्या कार्यकर्त्यांनी तात्काळ उपचरासाठी रुग्णालयात हलवलं आहे या वेळी स्टेचर नसल्याने आंदोलन स्थळी असलेल्या कर्त्यांनी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा जाहीर निषेध ही करत सरकार हेतू आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ही या वेळी करण्यात आला. 

CM Devendra Fadnavis: मोबाईल फोरेन्सिक व्हॅन्समुळे पुरावे नष्ट होणार नाहीत: मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणतीही घटना घडल्यानंतर मोबाईल फोरेन्सिक व्हॅन्स क्राईम सीनवर जाऊन क्राईम सीन तब्यात घेतील. तिथले पुरावे जमा करतील. ब्लड सँपल, नाक्रोटीक्स, एखाद्या स्फोटाचे सँपल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सँपल असतील त्याचे जागेवर टेस्टिंग करण्याचं कीट आहे. अनेकदा योग्य पुराव्याअभावी गुन्हेगार सुटताना दिसतात तसं आता होणार नाही. या कीटच्या माध्यमातून त्यांना प्राथमिक निष्कर्ष काढता येईल.

यासोबतच वेगवेगळ्या पुरावे कसे स्टोअर करायचे त्यासाठी ब्लॉक चेन तयार केली आहे. अनेकदा पुरावे बदललले जातात, मात्र ब्लॉक चेन पद्धतीमुळे पुरावे टँपर करता येणार नाहीत. अतिशय सबळ आणि सायंटिफीक पुरावा आपल्याकडे राहील. सर्व व्हॅन्समध्ये सीसीटीव्ही आणि फ्रीजही आहे, जेणेकरुन हव्या त्या तापमानावर पुरावे ठेवता येतील.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका तब्बल अर्धा तास अडकली होती. गुजरात वाहिनीवर चारोटी टोलनाक्यापासून 8 ते 10 किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  डहाणू तालुक्यातील चारोटी येथे उड्डाणपुलावर व्हाईट टॉपिंगचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. 

पुण्यात GBS च्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

पुण्यात GBS च्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पुण्यात एकाच दिवसात नव्या 28 रुग्णांची नोंद झाली आहे.   24 तासात पुण्यात GBS चे 28 रुग्ण समोर आले आहेत. तर पुणे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 101 वर गेली आहे. तर 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 

शिवसेना ठाकरे गटाची ठाणे जिल्ह्याची उद्या मातोश्रीवर आढावा बैठक

शिवसेना ठाकरे गटाची ठाणे जिल्ह्याची उद्या मातोश्रीवर आढावा बैठक होणार आहे.  2 फेब्रुवारीपासून ठाकरे गटाच ठाणे जिल्ह्यात शिव सर्वेक्षण अभियान सुरु होणार असून यासंदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांना उद्या सूचना केल्या जाणार आहे. 

Chandrapur Accident: चंद्रपूरमध्ये भीषण अपघात! 2 जणांचा मृत्यू, 15 जखमी

चंद्रपूर जिल्ह्यात कार आणि ऑटोच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी झाले आहेत. वरोरा तालुक्यातील येन्सा येथील घटना ही घटना असून रामपूर येथे काम संपवून ऊसतोड कामगार ऑटो ने वरोरा शहराकडे जात असताना चंद्रपूरकडे जाणाऱ्या बौद्ध भिख्खूच्या एका कारने त्यांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात रंजना चंद्रकांत झुंजूनकर (46) आणि सविता अरविंद बुरटकर (42) यांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले. जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असून एका गंभीर जखमी महिलेला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सर्व मजूर वरोरा येथील रहिवासी असून मोलमजुरीसाठी रामपूर या गावात ऊस तोडण्यासाठी गेले होते.

Dapoli News: दापोली बस आगारात आठ नवीन बसेस

दापोली एसटी आगारामध्ये आठ नवीन एसटी बसेस दाखल झाल्या आहेत. आणखी 40 ते 45 बस येत्या काही महिन्यात येतील, असा विश्वास राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे. दापोली आगारात दाखल झालेल्या नवीन बसेसच्या शुभारंभी प्रसंगी ते बोलत होते.. दरम्यान एसटीच्या वाढलेल्या भाडेवाढीचं मात्र मंत्री योगेश कदम यांनी समर्थन केलं आहे. सुविधा जर पुरवायच्या असतील तर एसटी भाडे दरवाढी शिवाय पर्याय नव्हता.. शेवटचा पर्याय म्हणून दरवाढ केलेली आहे. दरवाढ केल्यानंतर चांगल्या सुविधा मिळाव्यात ही जनतेची अपेक्षा असते,  त्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू असं मंत्री योगेश कदम यांनी म्हटलं आहे..

Live updates: एसटी भाडेवाडविरोधात शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन

राज्यसरकारने एसटी प्रवासाचे भाडेवाड करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या भाडेवाडीवरुन सामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अशातच एसटी भाडेविरोधात शिवसेना ठाकरे गट चक्का जाम आंदोलन करणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हे चक्का जाम आंदोलन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Jalna News: जरांगे पाटलांनी सकारात्मकता दाखवली तर त्यांची नक्की भेट घेणार : पालकमंत्री पंकजा मुंडे

मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराती येथे सामूहिक आमरण उपोषण सुरू केलं असून जरांगे पाटलांनी मला भेटण्याबाबत सकारात्मकता दाखवली तर नक्कीच त्यांची भेट घेईन,तसा निरोप देखील त्यांना पाठवणार असल्याचं जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.जरांगे यांच्या लढ्याला यश यावं अशी माझी भावना असल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केले. 

Dharashiv News: राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही, प्रताप सरनाईक

राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही ती बदलत असते आदलाबदल होत असते, तानाजी सावंत यांच्या नाराजीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे वक्तव्य:

पहिल्या जिल्हा नियोजन बैठकीला तानाजी सावंत गैरहजर, नाराजी बाबत आपल्याशी बोलणं झालं नसल्याचं सरनाईकांनी सांगितलं

पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईकांचा पहिला निर्णय आरोग्य विभागाचा, तुळजापुरात उभारणार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी  पहिला निर्णय आरोग्य विभागाचा घेतल्याने चर्चा... धाराशिव जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे विशेष लक्ष देणार असल्याचंही सरनाईकांनी केलं स्पष्ट

Dhule News: धुळ्यात लवकरच पालकमंत्री संपर्क कार्यालय स्थापन करणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

सामान्य नागरीकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांचा सात कलमी कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. या कार्यक्रमाची धुळे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. निर्णय प्रक्रिया अधिक गतीमान करण्यासाठी शासनाने ई ऑफिस प्रणालीचा वापर सुरु केला आहे. धुळे जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय ते तालुका स्तरापर्यंत ई ऑफिस प्रणालीचा वापर सुरु असून आतापर्यंत 38 हजार फाईल्स तयार केल्या असून संपूर्ण कामकाज ई ऑफिसद्वारे सुरु आहे. नागरिकांच्या सोईसाठी लवकरच पालकमंत्री संपर्क कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली...

Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबूराव चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबूराव चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल 

चांदेरे यांनी काल विजय रौंदळ या नागरिकाला केली होती मारहाण 

मारहाणीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल

पुण्यातील बावधन पोलीस स्टेशनमध्ये बाबूराव चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल 

जमिनीच्या वादातून चांदेरे यांनी केली होती मारहाण

Live Update : आदिवासी खाते न मिळाल्याने नरहरी झिरवाळ आधीपासूनच नाराज

आदिवासी विकास मंत्रालय नाशिकला असल्याने यासोबतच जिल्ह्यात आदिवासी आमदारांची संख्या जास्त असल्याने आदिवासी विकास मंत्रिपद मिळावं यासाठी राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळ यांनी चांगलाच जोर लावला होता. मात्र भाजपच्या अशोक उईके यांच्याकडे हे खाते गेल्याने नरहरी झिरवाळ नाराज होते.  नाशिकचे पालकमंत्रीपद तरी आपल्याला मिळेल अशी झिरवाळ यांना आशा असतानाच त्यांना हिंगोलीचे पालकमंत्री केल्याने झिरवाळ तीव्र नाराज असून आज हिंगोलीला भाषणात उघडपणे त्यांनी आपली नाराजी बोलूनही दाखवली

Live Update : विलास सोपान वाडेकरांची मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) चे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती

विलास सोपान वाडेकर यांची मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) चे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते श्री सुभाष चंद गुप्ता यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या MRVC मध्ये संचालक (तांत्रिक) म्हणून कार्यरत असलेले श्री वाडेकर हे भारतीय रेल्वे अभियंता सेवेचे १९९१ च्या बॅचचे अधिकारी आहेत.

Live Update : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने किल्ले शिवनेरी गडावर 100 फूट तिरंगा फडकवला

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने किल्ले शिवनेरी गडावर गणेश महाबरे यांच्या संकल्पनेतून मराठा सेवा संघाच्या वतिने स्वच्छता मोहीम राबवत 100 फुटी तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. यावेळी सिंदखेडराजा येथील संघाचे कार्यकर्ते व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Live Update : आंध्रप्रदेशच्या चित्ररथाने वेधलं सर्वांचं लक्ष

Live Update : यंदा संचलन पाहण्यासाठी 34 श्रेणींमध्ये सुमारे 10,000 विशेष पाहुण्यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित

या वर्षी हे संचलन पाहण्यासाठी 34 श्रेणींमध्ये सुमारे 10,000 विशेष पाहुण्यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये प्रमुख सरकारी योजनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावातील सरपंचांचा समावेश आहे.

Live Update : महाराष्ट्राचे प्रसाद प्रकाश वायकुळांकडे कर्तव्यपथावरील NCC च्या वरिष्ठ तुकडीचे नेतृत्व

कर्तव्यपथावरील NCC च्या वरिष्ठ तुकडीचे नेतृत्व महाराष्ट्र संचालनालयाचे वरिष्ठ अंडर ऑफिसर प्रसाद प्रकाश वायकुळांनी केलं.  

Live Update : गौतम बुद्धांवर आधारित बिहारचा चित्ररथ...

गौतम बुद्धांवर आधारित बिहारचा चित्ररथ...

Live Update : झारखंडच्या चित्ररथातून रतन टाटांना श्रद्धांजली

झारखंडच्या चित्ररथातून रतन टाटांना श्रद्धांजली

Live Update : कर्तव्यपथावरुन राज्यांच्या चित्ररथाचे संचलन...

कर्तव्यपथावरुन राज्यांच्या चित्ररथाचे संचलन...

Live Update : इंडोनेशियाचे जवानही पथसंचलनात सहभागी

इंडोनेशियाचे जवानही पथसंचलनात सहभागी

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबिआंत प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले आहेत. 

Live Update : दिल्लीच्या कर्तव्यपथावरुन पथसंचलनालयाला सुरुवात

Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावरुन Live

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावरुन Live 

Live Update : अपंग व्यक्तींच्या पेन्शनमधील वाढीसाठी आंदोलन सुरू

प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पोलीस ग्राउंडवर ध्वजारोहण करणार आहेत. अपंग व्यक्तींना दीड हजार पेन्शन मिळते. पेन्शनमधील वाढीसाठी आंदोलन सुरू आहे.  प्रहार अपंग संघटनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार येण्यापूर्वी आंदोलन सुरू. आहे. 

प्रहार अपंग संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे...

अजित पवार ज्या रस्त्याने येणार आहेत त्या रस्त्यावर हे आंदोलन सुरू आहे...

यावेळी काही अनुचित प्रकार पडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त...

Live Update : कोल्हापूर परिषदेच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना राष्ट्रपती पदक

कोल्हापूर परिषदेचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाला आहे. वैशिष्ट्यपूर्ण सेवा केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आलाय. यापूर्वी 2013 ला गुणवत्ता पूर्ण सेवा केल्याबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक मिळालेले होते. यंदाच्या पदकानंतर सुनील फुलारी यांना एकूण दोन राष्ट्रपती पदक मिळाले आहेत.

Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर ध्वजवंदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर ध्वजवंदन

Live Update : पुणे रेल्वे विभागात वर्षभरात 444 प्रवाशांचा अपघाती मृत्यू

पुणे रेल्वे विभागात वर्षभरात 444 प्रवाशांचा अपघाती मृत्यू 

पुण्यात 2024 मध्ये तब्बल 444 प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू

तर 167 प्रवासी वर्षभरात रेल्वे अपघातात गंभीर जखमी

रेल्वेतून पडून, रेल्वेखाली सापडून, रेल्वेचा धक्का लागून किंवा रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरून रेल्वेखाली पडून या कारणाने अनेक प्रवाशांचे झाले मृत्यू

पुणे रेल्वे विभागाकडून अपघात रोखण्यासाठी करण्यात येणार अनेक उपाययोजना

Live Update : रेल्वेवर सुरू असलेल्या मेगाब्लॉकचा मध्य रेल्वेच्या प्रवाशांना फटका

रेल्वेवर सुरू असलेल्या मेगाब्लॉकचा प्रवाशांना फटका 

सकाळपासून एकाच रुळावर 2-3 गाड्या उभ्या असल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना फटका

दादर स्थानकावर प्रवासी उतरले ट्रॅकवर 

सलग तीन दिवस सुरु असलेल्या मेगाब्लॉकचा त्रास नागरिकांना झाला