Flag Hoisting And Flag Unfurling : संपूर्ण देशात सध्या प्रजासत्ताक दिनाची (Republic Day) तयारी सुरु आहे. दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यंदा आपण 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. हा आपल्या राज्यघटनेच्या (Constitution) गौरवाचा दिवस आहे. याच दिवशी देशात लोकशाही राजवटीची स्थापना झाली. राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथासह शाळा, कॉलेज, वेगवेगळ्या संस्थांची कार्यालयांसह ठिकठिकाणी ध्वाजरोहण केले जाते. पण, झेंडा फडकावणे (flag hoisting) आणि ध्वजारोहण यामधील फरक तुम्हाला माहिती आहे का? हा फरक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
झेंडा फडकावणे आणि ध्वजारोहणातील अंतर (Difference Between Flag Hoisting and Flag Unfurling)
झेंडा फडकावणे आणि ध्वजारोहणातकील मुख्य फरक याची पद्धत आहे. दोन्ही ठिकाणी भारताचा राष्ट्रीय ध्वज असलेल्या तिरंग्याबद्दल सन्मान व्यक्त केला जातो. पण, या प्रक्रियेचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो.
झेंडा फडकावणे ( Flag Hoisting)
स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वज फडकावला जातो. यामध्ये ध्वज एका स्थितीमध्ये बांधलेला असतो. दोरीच्या मदतीनं त्याला ध्वजस्तंभाच्या वरपर्यंत नेले जाते. झेंडा वर गेल्यानंतर दोरीच्या मदतीनं तो फडकवला जातो. स्वातंत्र्य दिन हा आपल्या स्वातंत्र्याचा उत्सव आहे. त्या दिवशी मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान ध्वज फडकवतात. कारण तो लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधिचा सन्मान आहे. हा कार्यक्रम लाल किल्ल्यावर होतो.
( नक्की वाचा : पुणेकरांसाठी गुड न्यूज! प्रजासत्ताक दिननिमित्त मेट्रोची खास ऑफर; फक्त 20 रुपयात... )
ध्वजारोहण (Unfurling)
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारीला ध्वजारोहण केले जाते. या प्रक्रियेत झेंडा सुरुवातीपासूनच ध्वजस्तंभाच्या वरच्या भागाला बांधलेला असतो. राष्ट्रपती दोरी ओढतात आणि झेंडा हवेत फडकतो. त्यादिवशी दोरीनं झेंडा वर नेण्याची गरज नाही.
हे भारत देशात प्रजासत्ताक म्हणजे लोकशाही लागू झाल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे त्या दिवशी राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. कारण ते देशाचे घटनात्मक प्रमुख असतात. नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर हा मुख्य कार्यक्रम होतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world