2024 वर्ष संपाला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत आणि नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. तर 1 जानेवारी 2025 पासून देशातील अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. यात एलपीजीच्या किमतींपासून आणि ईपीएफओपर्यंत नियमांचा समावेश आहे.
सर्वसाधारणपणे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सरकार एलपीजीच्या किमतीत बदल करते. गेल्या काही काळात 19 किलोच्या व्यावसायिक LPG Cylinder च्या किमतीत अनेक बदल झाले आहेत. मात्र बऱ्याच महिन्यात देशातील 14 किलो स्वयंपाकाच्या सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत. अशात यंदा एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल होण्याची अपेक्षा केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पीएफ खातेधारकांचा 2025 वर्षांच्या सुरुवातीला एक खास गिफ्ट मिळू शकतं. ज्याच्या माध्यमातून एटीएम मशीनमधून पीएफचे पैसे काढता येतील. यासाठी कामगार मंत्रालय काम करीत आहे. अलीकडेच, कामगार सचिव सुमिता डावरा म्हणाले, श्रम आणि रोजगार मंत्रालय पीएफ काढणं सुलभ व्हावं आणि सेवा सुधारण्यासाठी आपली IT सिस्टम अपग्रेड करीत आहेत.
नक्की वाचा - इंटरनेटशिवाय करा UPI Payment, फक्त एका कॉलवर होणार पैसे ट्रान्सफर! वाचा संपूर्ण पद्धत
नुकतच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून फीचर फोन वापरकर्त्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. आता UPI 123 Pay चा वापर करून 10 हजार रुपयांपर्यंत यूपीआय पेमेंट केलं जाऊ शकतं. ही सुविधा 1 जानेवारी, 2025 पासून सुरू होईल. आतापर्यंत ही मर्यादा पाच हजारांपर्यंत होती. नुकतच रिझर्व्ह बँकेकडून शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आरबीआयने शेतकऱ्यांना गॅरेंटीशिवाय मिळणाऱ्या लोनची मर्यादा वाढवून 2 लाख रुपयांपर्यंत केली आहे. आधी ही मर्यादा 1.60 लाख रुपयांपर्यंत होती. नवे नियम 1 जानेवारी, 2025 पासून लागू होतील.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने आपल्या कराराच्या समाप्तीच्या दिवसात बदल जाहीर केले आहेत. एनएसईने 29 नोव्हेंबर रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले होते. आता FinNifty, MidCPNifty आणि NiftyNext50 चे मासिक करार संबंधित महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी संपतील. बँकनिफ्टीचे मासिक आणि त्रैमासिक करार एक्स्पायरी महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी संपतील.