एक रशियन महिला तब्बल 8 वर्षे गुहेत राहीली. ही गुहा बंगळुरू जवळच्या जंगलात होती. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. ऐवढचं काय तर या महिलेने याच गुहेमध्ये 2 मुलींना ही जन्म दिला. तिचं नावनीना कुटीना असं आहे. ती मुळची रशियन नागरिक आहे. 2016 मध्ये नीना कुटीना पहिल्यांदा बिझनेस व्हिसावर भारतात आल्या होत्या. सुरूवातीला गोवा आणि गोकर्ण येथे त्या फिरल्या. त्यांना ही दोन्ही स्थळं आवडली. पण पुढे 17 एप्रिल 2017 रोजी तिचा व्हिसा संपला. तेव्हा परत जाण्याऐवजी तिने इथेच राहण्याचा निर्णय घेतला.
2018 मध्ये त्यांना एक्झिट परिमट मिळालं होतं. त्यानंतर त्या नेपाळमध्ये गेल्या. पुन्हा काही दिवसांनी त्या भारतात परतल्या आणि कर्नाटकच्या जंगलात बेपत्ता झाल्या. त्यानंतर कर्नाटकमधील गोकर्णच्या जंगलातच त्यांनी 8 वर्षे मुक्काम केला. नीना कुटीना सांगतात, आम्हाला निसर्गात राहायला आवडतं, मी इतके दिवस तिथे राहिली पण मला कधीही भीती वाटली नाही. माझ्या मुलीही सोबत होत्या. त्यांनाही तिथे राहायला आवडतं. कधीही काहीही अडचण आम्हाला आली नाही. आम्ही खूप आनंदात तिथे राहात होतो. तिथलं वातावरण, जेवण आम्हाला खूप आवडायचं असं त्यांनी ज्यावेळी त्यांना पकडलं त्यावेळी त्यांनी सांगितलं.
नक्की वाचा - Satara News: आली लहर केला कहर! नव्या गाडीचं सेलिब्रेशन, थेट महामार्गच रोखला, मग पुढे...
नीना ज्या गुहेत राहात होती तिखे शंकराची मूर्ती, रशियन पुस्तकं आणि हिंदू देव देवतांचे फोटोही सापडले आहेत. नीनाच्या दोन्ही मुलीही त्याच्यासोबतच होत्या . या दोन्ही मुलींचा जन्म देखील इथेच झाला आहे. प्रेमा नावाची मुलगी 6 वर्षांची तर आमा नावाची 4 वर्षांची मुलगी त्यांना आहे. मुलींच्या वडिलांबद्दल माहिती देण्यास मात्र नीना नकार दिला आहे. त्यामुळे या मुलींचा पिता कोण आहे हे गुलदस्त्यात आहे. ही बाब आता चौकशीत समोर येवू शकते. शिवाय मुलींच्या प्रसूतीदरम्यान कुठलीही वैद्यकीय मदत घेतली का याचा तपास ही सुरू झाला आहे.
नीना कुटीना यांनी सांगितले की, आम्ही पूर्णवेळ त्या गुहेत राहात होतो. आम्ही तिथे राहात असताना खूप मजा केली. इथले सगळे व्हिडीओ फोटो आमच्याकडे आहेत. आम्ही तिथल्या आठवणी गोळा केल्या आहेत. आम्ही दररोज वेगवेगळे पदार्थ बनवायचो. वेगवेगळे खेळ खेळायचो. खूपच मजा आम्ही केली. आम्हाला ती जागा आवडायची. आम्हाला पुन्हा जाण्यापेक्षा तिथे राहायला आवडेल. वनविभागाला जंगलात मुलींची पावलं मातीत उमटलेली दिसली यानंतरच हे सगळं प्रकरण समोर आल आहे. नीनाची चौकशी अजूनही सुरू आहे. नीना कुटीनाने अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप दिलेली नाही. या चौकशीत आणखी काही खुलासा होण्याची दाट शक्यता आहे.