
सध्या रिल्स बनवण्याचं फॅड सगळीकडेच फोफावलत चाललं आहे. त्यासाठी वाट्टेल ते केलं जात आहे. जीव धोक्यात टाकला जात आहे. यात काहींना आपला जीव ही गमवावा लागला आहे. पण त्यातून शहाणं होताना काही दिसत नाही. रिल्स स्टार्स वाढतच चालले आहे. त्यांना कसलीच भीती किंवा धाक राहीलेला नाही. काही लाईक्स आणि कमेन्स्टसाठी ते मोठ्यातली मोठी रिस्क घेण्यास तयार असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. इथं तर एका पठ्ठ्यानं नवीन गाडी घेण्याचं असं काही सेलिब्रेशन केलं त्यामुळे सर्वच जण आवाक झाले.
गाडी घेतल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन हे होत. मात्र एका पठ्ठ्याने चक्क महामार्ग अडवूनच गाडीचं सेलिब्रेशन केलं. हा धक्कादायक प्रकार घडलाय पुणे बंगळुरू महामार्गावर घडला. साताऱ्याजवळ या पठ्ठ्याने थेट राष्ट्रीय महामार्गच आपल्या सेलिब्रेशनसाठी अडवला. त्याने नवी कोरी स्कार्पिओ कार घेतली होती. त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी त्याने ती कार महामार्गावर आणली. तिथेच त्याने सेलिब्रेशन सुरू केले.
त्यासाठी त्याने चक्क महामार्ग रोखून धरला. त्याने आपली स्कॉर्पिओ कार महामार्गाच्या मधोमध उभी केली. त्यानंतर गाडी बरोबर फोटो सेशन ही सुरू केले. त्याने भागलं नाही म्हणून त्याने ड्रोन शूट ही केलं. त्याची ही हौस त्याने यावेळी भागवून घेतली. हे सर्व होत असताना महामार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. पुढे काय सुरू आहे हे त्यांना समजत नव्हतं. नाही पोलिस होते ना काही यंत्रणा होती. या शुटचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
दरम्यान याबाबत अजूनही त्या गाडी मालकावर कोणतीही कारवाई झालेली नाही. अशा प्रकार राष्ट्रीय महामार्ग रोखून धरणे हे किती योग्य ते ही रिल काढण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. सेलिब्रेशन करा पण ते तुमच्या घरी. अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी सर्व सामान्यांना वेठीस धरणे किती योग्य आहे. त्यामुळे या लोकांवर कारवाई होणार का याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. शिवाय या रिल बहाद्दरांना कोण पायबंद घालणार हा प्रश्नही अनुत्तरीत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world