Sachin Tendulkar Viral Tweet : नीट पेपर लीकमुळे देशभरातली विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानात देशव्यापी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाबाबत दिग्गज सेलिब्रिटी सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.अशातच सचिन तेंडुलकरे एक्सवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.सचिनने ट्वीट करत म्हटलंय, "विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे, तिथे मेरिटचा विजय होवो". गेल्या अनेक दिवसांपासून कॉकरोज जनता पार्टीने सरकार विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. नीट पेपर लीकच्या विरोधात देशभरातील विद्यार्थी एकवटले आहेत.
सचिनने एक्सवर म्हटलंय, "माझे वडील एक प्रोफेसर होते. ते अनेक तरुण विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक आणि सल्लादार होते.त्यांनी मला सुरुवातीपासूनच एक गोष्ट शिकवली होती, अपयश ठीक आहे, पण चीटिंग करणं नाही. कधीही शॉर्टकट स्वीकारू नको. समाजात मोठं असल्याने आपली जबाबदारी आहे की, संस्कृतीला योग्य दिशा द्या.जो समाज मेहनती शिवाय निकालांना जास्त महत्व देतो, तो क्षमेतेपेक्षा शॉर्टकटला निवडतो".
नक्की वाचा >> IND vs ZIM : वैभव सूर्यवंशीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, 'हा' कारनामा करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज
"तरुण भारत स्वप्न आणि उर्जेने भरलेला"
सचिनने पुढे म्हटलं, "आज, जेव्हा विद्यार्थी नैराश्यात आहेत की, त्यांच्या कठोर मेहनतीचा त्यांना फळ मिळालं नाही, तर त्यांची नाराजी समजली जाऊ शकते. आपण सर्वांनी मिळून हे निश्चित केलं पाहिजे की,त्यांच्यापुढे पुन्हा अशी स्थिती निर्माण न होवो. तरुण भारत स्वप्न आणि उर्जेने भरलेला आहे. तो आमच्या यशाचा आधार आहे.
नक्की वाचा >> Palghar News : मुंबई–अहमदाबाद महामार्गावर 40 किमीपर्यंत मोठी वाहतूक कोंडी, हजारो प्रवासी अडकले, कारण काय?
एक समाज म्हणून, आई-वडील, शिक्षक, मित्र, नातेवाईक, शाळा आणि एडमिनिस्ट्रेटर- आपल्या सर्वांची एक मोठी जबाबदारी आहे. वेगवेगळ्या भूमिका आहेत. जेणेकरून आपले तरुण नेहमीच उत्साहित आणि उर्जावान राहतील. आपल्याला अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल, जिथे कठोर मेहनतीला प्राधान्य दिलं जाईल. प्रामाणिकपणाला महत्त्व मिळेल आणि क्षमतेचा विजय होईल. मला विश्वास आहे की, आपण सर्व मिळून असा पर्याय काढू,जो आपल्या मुलांच्या भविष्याला मजबूत करेल आणि त्यांच्या अपेक्षांना सुरक्षीत ठेवेल. जय हिंद".