जाहिरात

IND vs ZIM : वैभव सूर्यवंशीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, 'हा' कारनामा करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज

भारताचा 15 वर्षीय क्रिकेटर वैभव सूर्यवंशीने शनिवारी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे.वैभव सूर्यवंशी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक ठोकणारा जगातील सर्वात तरुण फलंदाज बनला आहे.

IND vs ZIM : वैभव सूर्यवंशीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, 'हा' कारनामा करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज
Vaibhav Sooryavanshi Breaks Sachin Tendulkar Record

Vaibhav Sooryavanshi Record : भारताचा 15 वर्षीय क्रिकेटर वैभव सूर्यवंशीने शनिवारी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे.वैभव सूर्यवंशी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक ठोकणारा जगातील सर्वात तरुण फलंदाज बनला आहे.वैभवने गुरूवारी 15 वर्ष आणि 118 दिवस इतक्या वयात झिम्बाब्वे विरोधात हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये हा कारनामा केला आहे.

वैभवने 19 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 50 धावांची खेळी केली. याचसोबत वैभवने जिब्राल्टरचा फलंदाज लुई ब्रूसचा विक्रम मोडला आहे. ज्याने वर्ष 2021 मध्ये माल्टाच्या विरोधात 16 वर्ष आणि 56 दिवसांच्या वयात अर्धशतक ठोकलं होतं. या लिस्टमध्ये कविन चड्डा तिसऱ्या स्थानावर आहे. ज्याने वर्ष 2026 मध्ये इंडोनेशियाकडून खेळताना 16 वर्ष आणि 76 दिवसांच्या वयात स्वीडन विरुद्ध हा कारनामा केला होता. 

नक्की वाचा >> Palghar News : मुंबई–अहमदाबाद महामार्गावर 40 किमीपर्यंत मोठी वाहतूक कोंडी, हजारो प्रवासी अडकले, कारण काय?

वैभव सूर्यवंशीचा त्या लिस्टमध्ये समावेश

सिएरा लियोनचा अलुसीन तुरे या लिस्टमध्ये चौथ्या स्थानावर आहे. ज्याने 16 वर्ष आणि 89 दिवसांच्या वयात घाना विरोधात वर्ष 2023 मध्ये अर्धशतक ठोकलं होतं. भूटानचा तेनजिन रबगी (16 वर्ष आणि 118 दिवस) या लिस्टमध्ये पाचव्या स्थानावर आहे. ज्याने वर्ष 2023 मध्ये चीन विरूद्ध त्यांचा पहिलं टी-20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक केलं होतं. वैभवने पुरुषांच्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 50 हून जास्त स्कोअर करण्याच्या लिस्टमध्ये दिग्गज फलंदाज तेंडुलकरचाही विक्रम मोडला आहे. सचिनने 16 वर्ष 213 दिवस वयात पहिलं अर्धशतक ठोकलं होतं. तर वैभवने हा कारनामा फक्त 15 वर्ष 118 दिवसांच्या वय असताना केलं आहे.

नक्की वाचा >> Badlapur News : बदलापूर, वांगणी परिसराला वादळी वाऱ्याचा फटका! दोन दिवसांपासून बत्ती गुल, काही शाळांना सुट्टी

पहिलं अर्धशतक ठोकणारा सर्वात कमी वयातील खेळाडू

15 वर्ष 118 दिवस - वैभव सूर्यवंशी (IND) विरुद्ध ZIM, हरारे, 2026 (T20I)
16 वर्ष 213 दिवस - सचिन तेंडुलकर (IND) विरुद्ध PAK, फैसलाबाद, 1989 (टेस्ट)
16 वर्ष 214 दिवस - शाहिद अफ्रिदी (PAK) विरुद्ध SL, नैरोबी,1996 (ODI)
17 वर्ष 39 दिवस - मुश्ताक मोहम्मद (PAK) विरुद्ध IND, कोलकाता 1960 (टेस्ट)
17 वर्ष 63 दिवस -मोहम्मद अशरफुल विरुद्ध SL,कोलंबो (SSC),2001 (टेस्ट)

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com