१२ जून २०२५ रोजी झालेल्या विमान अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्या विमानातील एकमात्र व्यक्ती विश्वास कुमार रमेश जिवंत राहिली. या विमानात त्याचा सीट नंबर ११अ होता. या अपघातानंतर ११अ ही सीट सर्वात सुरक्षित मानली जात आहे. मात्र जेव्हा कारबद्दल सांगायचं झालं तर यातील सर्वात सुरक्षित सीट कोणती, हे तुम्हाला माहीत आहे का? चार सीटर किंवा सात सीटर कारमध्ये कुठं बसणं सर्वात सुरक्षित आहे? आज तुम्हाला कारमधील सर्वात सुरक्षित सीटबद्दल सांगणार आहोत.
कारमधील सर्वात सुरक्षित सीट...
कारमधील मागील म्हणजे रियर मिडल सीट सर्वात सुरक्षित मानली जाते आणि यामागे अनेक कारणं आहेत.
१ कारची धडक झाली तर मधली सीट परिणामापेक्षा लांब असते.
२ या सीटवर एअरबँग्ज आणि साइड क्रॅश दोन्हीपासून सुरक्षा मिळते.
३ अपघातावेळी ही सीट पुढे-मागे दोघांमध्ये संतुलन ठेवते
४ या सीटमध्ये एअरबॅगचा धोका नसतो आणि झटके कमी लागतात.
नक्की वाचा - Telangana Bus Accident: किंकाळ्या...रक्ताचा सडा अन् मृतदेहांचा खच; भीषण अपघातात 20 हून अधिक प्रवासी जागीच ठार
त्यामुळे परदेशातही रियर मिडल सीटवर लहान मुलांना बसवतात. तुमच्यासोबत लहान मुल असेल तर त्याची सुरक्षा मागील सीटवर आहे. या सीटची सुरक्षा अधिक वाढविण्यासाठी नेहमी सीट बेल्ट लावावेत. तेव्हाच ही सीट पूर्णपणे सुरक्षित मानली जाते.
कारमधील सर्वात असुरक्षित सीट (Unsafe Car Seat)
सुरक्षित सीटनंतर कारमधील सर्वात असुरक्षित सीट कोणती असते ते पाहूया. ती सीट असते ड्रायव्हरची. कार धडकली तर त्याचा पहिला परिणाम याच सीटवर होतो. याशिवाय, पुढची प्रवासी सीट एअरबॅगजवळ असल्याने ती मुलांसाठी सुरक्षित नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
