मनीष रक्षमवार, प्रतिनिधी
तेलंगणामधील रंगारेड्डी येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की बसमधील २० हून अधिक प्रवासी जागीच ठार झाले. यापुढेही मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक विरुद्ध दिशेने येत होता.
नेमकं काय घडलं?
तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल येथे आज भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तंदूर डेपोची बस हैद्राबादला जात होती. यावेळी समोरून एक ट्रक भरधाव वेगाने येत होता. या ट्रकमध्ये खडी भरलेली होती. ट्रक चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रकने थेट बसला धडक दिली. हा ट्रक विरुद्ध दिशेने येत होता. ट्रकची धडक इतकी भीषण होती की ट्रक अक्षरश: बसवर कोसळला. यामुळे कित्येक प्रवासी याखाली दबले गेले. बसमध्ये सर्वत्र खडी पसरल्याचं दिसून येत आहे. या अपघातानंतर एकच गोंधळ उडाला. प्रवासी मदतीसाठी आरडाओरड करीत होते. या भीषण अपघातात ट्रक चालकाचाही जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये 70 हून अधिक प्रवासी होते. त्यातील 20 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.
नक्की वाचा - Girl Driving Car : 17 वर्षांच्या मुलीला कार शिकवताना भयंकर घडलं; बापासह तीन बहिणींचा जागीच मृत्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदतीची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत देण्याची घोषणा केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
