कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले बृजभूषण सिंह यांच्या पुत्राला उत्तर प्रदेशातील केसरजंग लोकसभा जागेवरुन उमेदवारीचं तिकीट देण्यात आलं आहे. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर बृजभूषण सिंह यांना तिकीट देण्यात आलं नाही. मात्र त्यांचे पुत्र करणसिंह यांना उत्तर प्रदेशातील केसरजंग मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. यावरुन कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. या निर्णयामुळे देशाच्या मुली हरल्याचं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप...
ऑलिम्पिक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. यावेळी त्यांच्यासोबत बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटही होते. सर्वांकडून बृजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी महिनाभरापर्यंत जंतर-मंतरवर आंदोलन पुकारलं होतं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बृजभूषण सिंह हे केसरगंज मतदारसंघातून खासदार आहेत. आता त्यांचा पुत्र या जागेवरुन भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. यावरुन कुस्तीपटूंमध्ये नाराजी आहे. साक्षीने ट्विटरवर पोस्ट करीत लिहिलं की, देशातील मुलींचा पराजय झाला आणि बृजभूषण सिंह जिंकला. कुस्तीपटूंच्या न्यायाच्या मागणीकडे लक्ष दिलं नसल्याचं साक्षी मलिक हिने सांगितलं.
नक्की वाचा - लैंगिक शोषण प्रकरण : प्रज्वल रेवण्णांना 7 दिवसांची मुदत देण्यास SIT कडून नकार
आम्ही सर्वांनी आपलं करिअर पणाला लावलं, अनेक दिवसांपर्यंत ऊन-पावसात रस्त्यावर राहिलो. मात्र अद्याप बृजभूषण यांना अटक करण्यात आली नाही. आम्ही काहीच मागत नाही, आम्हाला न्याय हवा आहे. पुढे साक्षी म्हणाली, अटक सोडा, आज त्यांच्या पुत्राला तिकीट देऊन तुम्ही देशातील कोट्यवधी मुलींचं खच्चीकरण केलं आहे. देशाचं सरकार एका व्यक्तीसमोर इतकं कमकुवत आहे? त्यांना रामाच्या नावार केवळ मतं हवीत, त्यांनी दाखवलेल्या मार्गाकडे दुर्लक्ष केलं जातं