जाहिरात
This Article is From May 02, 2024

लैंगिक शोषण प्रकरण : प्रज्वल रेवण्णांना 7 दिवसांची मुदत देण्यास SIT कडून नकार

कथित लैंगिक शोषण प्रकरणात अडकलेले हासन मतदारसंघाचे खासदार, भाजप-जनता दल युतीचे लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांना विशेष तपास पथकाकडून दिलासा मिळालेला नाही.

लैंगिक शोषण प्रकरण : प्रज्वल रेवण्णांना 7 दिवसांची मुदत देण्यास SIT कडून नकार
बंगळुरू:

कथित लैंगिक शोषण प्रकरणात अडकलेले हासन मतदारसंघाचे खासदार, भाजप-जनता दल युतीचे लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांना विशेष तपास पथकाकडून दिलासा मिळालेला नाही. या विशेष तपास पथकाकडून प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात अश्लील व्हिडिओ प्रकरणात तपास केला जात आहे. या एसआयटीने रेवण्णा यांना 7 दिवसांची मुदत देण्यास नकार दिला आहे. जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णा सध्या परदेशात आहेत. त्यांनी एसआयटीसमोर हजर होण्यासाठी सात दिवसांची वेळ मागितली होती. मात्र तपास पथकाने त्यांना वेळ देण्यास नकार दिला आहे. 

ते शुक्रवारी भारतात परतणार असल्याचं सांगितलं जात होतं. परतताच एसआयटी त्यांना ताब्यात घेणार होती. मात्र प्रज्वल यांनी हजर होण्यासाठी सात दिवसांचा अवधी मागितला, मात्र विशेष पथकाने यास नकार दिला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल रेवण्णा यांनी जर्मनीतून बंगळुरूसाठी तिकीट बुक केलं आहे. ते उद्या 3 मेच्या सायंकाळी कॅम्पगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतील. प्रज्वल 4 मे रोजी एसआयटीच्या समोर हजर होणार असल्याची शक्यता आहे. मात्र यादरम्यान त्यांना विमानतळावरुनच ताब्यात घेतलं जाऊ शकतं. त्यांना येत्या 24 तासाच्या आत अधिकाऱ्यांसमोर हजर व्हावं लागेल. 

नक्की वाचा - मोदींमुळे माझे लग्न मोडले! 4 बायका आणि 16 मुलांचा बाप असलेल्या मौलवीने सांगितले आपले दु:ख

प्रज्वल रेवण्णा यांच्यावर काय आहेत आरोप?
माजी पंतप्रधान आणि जेडीचे प्रज्वल देवेगौडा यांचे नातू आणि माजी मंत्री एच.डी.रेवण्णा यांचे पूत्र आहेत. निवडणुकीपूर्वी सोशल मीडियावर मोठ्या संख्येने प्रज्वल यांच्याशी संबंधित कथित व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. ज्यानंतर कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष नागलक्ष्मी चौधरी यांच्या सूचनेनंतर कर्नाटक सरकारने एसआयटी गठण केलं होतं. प्रज्वल यांच्याकडे पूर्वी काम करणारा आचारी आणि नातेवाईकांच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरोधात होलेनारासीपुरा येथे कथित लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.  


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com