
Sambhal Shiva Temple : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात खग्गू सराय भागातील भस्म शंकर मंदिर गेली 46 वर्ष बंद का होतं? या प्रश्नावर सध्या राजकारण तापलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित केला. योगायोगाची गोष्ट म्हणजे शिव मंदिर शाही जामा मशिदीपासून फक्त एक किलोमीटर दूर आहे. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी दंगल झाली होती. संभलमध्ये शिव मंदिराचे दरवाजे 1978 नंतर पहिल्यांदा कसे उघडले? ती घटना देखील धक्कादायक आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार संभलमधील बनिया मोहल्ल्यात 1978 साली दंगल उसळली होती. त्यामध्ये 184 पेक्षा जास्त जणं मारले गेले होते. त्यानंतर येथील शिव मंदिर बंद करण्यात आले. आता 46 वर्षांनंतर संभल दंग्यांची फाईल पुन्हा ओपन होणार आहे. या मंदिराशी संबंधित आणखी काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संभल दंगलीची फाईल पुन्हा ओपन होणार
उत्तर प्रदेश विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथयांनी संभलमधील शिव मंदिराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी या विषयावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यानंतर या दंगलीची फाईल पुन्हा ओपन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संभलमध्ये 29 मार्च 1978 या दिवशी दंगल उसळली होती. ही दंगल अनेक दिवस चालली. त्यानंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. एकूण 184 जणांचा या दंगलीत मृत्यू झाला. या प्रकरणात एकूण 169 जणांवर खटले दाखल करण्यात आले होते. पण, स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार 184 जणांना 46 वर्ष उलटली तरी न्याय मिळालेला नाही. आता या फाईल पुन्हा ओपन होणार असल्यानं पीडितांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
( नक्की वाचा : मंदिर बंद, खाती गोठावली! 'इस्कॉन' वर बांगलादेश सरकारचा इतका राग का आहे? )
मंदिरातील विहिरीमध्ये काय सापडलं?
संभल जिल्ह्यातील भस्म शिव मंदिराच्या परिसरात एक विहीर होती. त्या विहिरीतील पाण्यानं मंदिरात पूजा-अर्चना होत असे. पण, मंदिर बंद असल्यानं इथं अतिक्रमण झालं. आता या विहिरीचं खोदकाम करण्यात येत आहे. या विहिरीमध्ये आत्तापर्यंत तीन खंडित मूर्ती मिळाल्या आहेत. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.
श्री कार्तिक महादेव मंदिर (भस्म शंकर मंदिर) 13 डिसेंबर रोजी पुन्हा उघडण्यात आले होते. त्यावेळी अतिक्रमण विरोधी मोहिमेमध्ये तिढं ढाचा सापडला. मंदिरामध्ये हनुमाची मूर्ती आणि शिवलिंग स्थापित होते. पण, 1978 साली हे मंदिर बंद होते. मंदिराच्या जवळची विहीर पुन्हा सुरु करण्याची योजना आहे. संभलचे जिल्हाधिरी राजेंज्र पेंसिया यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, 'प्राचीन मंदिर आणि विहीर आम्हाला मिळाली आहे. त्या ठिकाणी खोदकाम सुरु आहे. या खोदकामाच्या दरम्यान सर्वात पहिल्यांदा पार्वती देवीची मूर्ती पहिल्यांदा मिळाली होती. ती खंडित मूर्ती होती. त्यानंतर श्रीगणेश आणि लक्ष्मी मातेची मूर्ती आम्हाला मिळाली.

या मूर्तींची तोडफोड करुन त्या आतमध्ये ठेवल्या होत्या का? या प्रश्नावर हा चौकशीचा विषय आहे, असं जिल्हाधिकारी पेंसिया यांनी सांगितलं. 'मूर्ती आतमध्ये कशा गेल्या. काय झालं होतं आणि काय नाही हे सखोल चौकशीनंतरच समजेल. मंदिराच्या जवळील काही अतिक्रमण लोकांनी स्वत: हटवलं आहे. आम्ही सूचना दिली असून पुढील प्रक्रिया सुरु केली आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून हे अतिक्रमण हटवलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
हे मंदिर संभलमधील शाही जामा मशिदीपासून फक्त 1 किलोमीटर दूर आहे. या मशिदीमध्ये 24 नोव्हेंबर रोजी कोर्टाच्या आदेशानुसार सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वेक्षाच्या विरोधात हिंसाचार झाला होता. जिल्हा प्रशासनानं 'कार्बन डेटिंग'साठी भारतीय पुरात्व सर्वेक्षण विभागाला पत्र लिहलं आहे. 'कार्बन डेटिंग'मधून प्राचीन स्थळ नेमकं किती वर्ष जुनं आहे, हे निश्चित करता येते. या मंदिरामध्ये भक्तांची गर्दी वाढत आहे, असं प्रशासनानं स्पष्ट केलं. या मंदिराला 24 तास सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून या परिसरावर नजर ठेवली जात आहे. मंदिरातील पूजा देखील सुरु झाली असून परिसरातील अतिक्रमण हटवलं जात आहे, असं जिल्हाधिकारी पेंसिया यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : देशात हिंदूच्या लोकसंख्येत घट, मुसलमानांची लोकसंख्या 43 टक्के वाढली )
संभळचं सत्य काय?
उत्तर प्रदेश बाजपाच्या नेत्यांनी संभळचं सत्य संपूर्ण देशासमोर आलं पाहिजे, असं मत व्यक्त केलंय. कोणत्या परिस्थितीमध्ये येथील हिंदूंना पलायन करणे भाग पडलं हे देशाला समजलं पाहिजे. या मोहल्ल्यामध्ये शिव मंदिर होते. त्यामुळे तिथं हिंदू नक्की असतील हा तुम्ही अंदाज करु शकता. काश्मिरी पंडितांची वेदना सर्व देशानं अनुभवली आहे. आता संभलच्या हिंदूंची वेदना देखील सर्वांसोमर आली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलंय.

मंदिराचे दरवाजे कसे उघडण्यात आले?
संभळमध्ये प्रशासन आणि पोलिसांची संयुक्त टीमनं वीज चोरीला आळा घालण्यासाठी मोहीम सुरु केली होती. त्यावेळी गच्चीवरील, तसंच धार्मिक स्थळांमधील अवैध कनेक्शन हटवण्यासाठी अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई सुरु केली होती. त्यानुसार अनेक घरं तसंच मशिदींमधील अवैध वीज कनेक्शन कापण्यात आले. यावेळी एका घरात लपलेलं एक मंदिर पोलिसांना दिसलं. पोलिसांनी याबाबत चौकशी केली. त्यावेळी इथं अनेक वर्षांपासून बंद असलेलं मंदिर आहे, अशी त्यांना माहिती समजली. त्यानंतर प्रशासनानं मंदिराचे दरवाजे उघडले आणि आतमध्ये स्वच्छता केली. त्यावेळी संभलमध्ये 1978 साली झालेल्या दंगलीनंतर हे मंदिर कधीही उघडण्यात आले नाही, ही माहिती उघड झाली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world