Sand Mafia : संतापजनक, वाळू माफियांवर कारवाईवर गेलेल्या पोलिसाला ट्रॅक्टरने चिरडलं

वाळू तस्करी रोखण्यासाठी दोन चार पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले होते. अशात तस्कऱ्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी चढवली. यानंतर इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी तेथून पळ काढला.

जाहिरात
Read Time: 2 mins

छत्तीसगडमध्ये वाळू माफियांची हिम्मत इतकी वाढली आहे की, त्यांना आता कायद्याचीही भीती राहिलेली नाही. छत्तीसगडमध्ये वाळू माफियांनी एका पोलिसाची निघृणपणे हत्या केली होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांकडून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

मिळालेल्या माहितीनुसार, सनवल पोलीस स्टेशन हद्दीतील लिब्रा गावात अवैध वाळू उत्खनन थांबवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला. त्या हल्ल्यात एका पोलिसाचा निर्दयीपणे मृत्यू झाला.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Road Accident : बहुतांश बाईकस्वार हा नियम मोडतात, एक चूक अन् मीरज-कोल्हापूर रस्त्यावर तरुणाचा मृत्यू

पोलीस गस्तीवरील असतांना बेकायदेशीर वाळू उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे गस्त पथक कन्हार नदीच्या काठावर पोहोचले व त्यांनी घटनास्थळी कारवाई सुरू करताच वाळू वाहून नेणाऱ्या माफियांनी अचानक ट्रॅक्टर वेगाने हवालदाराकडे वळवला. ट्रॅक्टरने जबर धडक दिली. या धडकेत कॉन्स्टेबलला गंभीर दुखापत झाली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी पळ काढला. सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी दोन चार पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले होते. अशात तस्कऱ्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी चढवली. यानंतर इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी तेथून पळ काढला.  

Advertisement