SBI Manager Salary : कागदावर 35 लाख, हातात किती? SBI मॅनेजरची सॅलरी स्लिप पाहून लोक चक्रावले

सध्या सोशल मीडियावर SBI बँकेच्या मॅनेजरचा सॅलरी स्लिप जलद गतीने व्हायरल होत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

SBI Manager Salary : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. बँकेतील कर्मचाऱ्यांची वागणूक, त्यांचा बँकिंग व्यवहार आणि अन्य अनेक गोष्टी नेहमीच चर्चेत असतात. याशिवाय आणखी एक गोष्ट म्हणजे SBI कर्मचाऱ्यांचा पगार. ज्यासाठी अनेक लोक या बँकेत नोकरीसाठी प्रयत्न करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर SBI बँकेच्या मॅनेजरचा सॅलरी स्लिप जलद गतीने व्हायरल होत आहे. 

SBI बँक मॅनेजरचा पगार किती असतो?

एक्सवर एका युजरने एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका मॅनेजरचा Form 16 दिसत आहे, जो जलद गतीने व्हायरल होत आहे. या फॉर्ममध्ये मॅनेजरची वार्षिक ग्रॉस सॅलरी तब्बल ३५.२४ लाख असल्याचं दिसत आहे. हे आकडे पाहून अनेकजण हैराण झाले आहेत आणि सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या सॅलरीबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. 

Advertisement

ही पोस्ट शेयर करीत कॅप्शनमध्ये लिहिलंय, अनेकदा लोक म्हणतात की, SBI कर्मचाऱ्यांची नोकरी पूर्णपणे सेटल असते. मात्र SBI च्या एका स्केल-३ मॅनेजरचा पगार पाहून तुमचा विचार बदलू शकतो. तब्बल ८ वर्षांपूर्वी त्यांनी SBI मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून नोकरी सुरू केली होती. आज त्यांच्या FY 2025-26 च्या Form 16 मध्ये 35.24 लाखांची ग्रॉस सॅलरी दिसत आहे. पहिल्या नजरेत ही रक्कम खूप मोठी वाटते, मात्र हे पूर्ण सत्य नाही. 

पगाराचं सत्य काय आहे?

या पोस्टमध्ये युजरने सॅलरी डिस्क्राइब करताना लिहिलंय, या ग्रॉस सॅलरीमध्ये LFC इन्कॅशमेंट आणि लिव्ह इन्कॅशमेंट सारख्या खर्चाचा समावेश आहे. हा मासिक पगाराचा भाग नाही, तर दर चार वर्षांनी मिळणारे लाभ आहेत. याशिवाय प्रत्येक महिन्याला इन्कम टॅक्स, एनपीएस, ईपीएफ, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि दुचाकी कर्जाचे ईएमआय यांसारख्या विविध कपातींचाही समावेश असतो. यामुळेच फॉर्म १६ मध्ये दाखवलेला एकूण पगार आणि दर महिन्याला बँक खात्यात जमा होणारा हातात येणारा पगार यामध्ये लक्षणीय तफावत असते.

सोशल मीडियावर चर्चा...

या पोस्टच्या शेवटी युजरने लोकांना प्रतिक्रिया देण्याचं आवाहन केलं आहे. अशात सोशल मिडिया युजरने आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. या पोस्टवर अनेक लोक कमेंट करत आहेत की, हा पगार दुरून प्रभावी वाटत असला तरी, त्यांना वास्तवाची कल्पना नाही. मात्र, याच्याशी असहमत असलेले अनेक युझर्सही आहेत.

(वरील लेख सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)