- देशातील विविध राज्यांमध्ये थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शाळांना हिवाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत
- जम्मू-काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे आणि बर्फामुळे सलग सात दिवसांसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली.
- उत्तर प्रदेशात सरकारी आणि खासगी शाळांना 20 ते 31 डिसेंबरपर्यंत 12 दिवसांची हिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
देशात अनेक ठिकाणी आता थंडीने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी पारा घसरत चालला आहे. त्यामुळे थंडीने सर्वांनाच हुडहुडी भरली आहे. अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात खाली गेला आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे आणि दाट धुक्यामुळे लहान मुलांना शाळेत जाणे कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून अनेक राज्यांमध्ये शाळांना हिवाळी सुट्ट्या (Winter Holidays) जाहीर करण्यात आल्या आहेत. या सुट्ट्या एक दोन दिवस नाही तर सलग सहा दिवस देण्यात आल्या आहेत. 9 डिसेंबर ते 10,11,12,13 आणि 14 डिसेंबर पर्यंत या सुट्ट्या असतील.
हिवाळ्यात जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ भागात सर्वाधिक सुट्ट्या घोषित झाल्या आहेत. कडाक्याची थंडी आणि रस्त्यांवरील बर्फ यामुळे, 8 ते 14 डिसेंबर या सलग 7 दिवसांसाठी जम्मू काश्मीरमधल्या शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे. त्यात पूर्व-प्राथमिक ते इयत्ता 8वी पर्यंतच्या शाळा संपूर्ण डिसेंबर 2025 महिनाभर बंद राहणार आहेत. इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना 11 डिसेंबर 2025 ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे काश्मीर मधील विद्यार्थ्यांना एक प्रकार दिलासा मिळाला आहे.
जम्मू-काश्मीर प्रमाणेच उत्तर भारतातील इतर राज्यांनीही हिवाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्यात ही उत्तर प्रदेशात कडाक्याची थंडी आहे. येथे सरकारी आणि खासगी शाळांना 20 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत, म्हणजेच एकूण 12 दिवसांची सुट्टी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश प्रमाणे राजस्थानमध्ये ही सध्या पारा कमालीचा घसरला आहे. त्यामुळे राजस्थान सरकारने 25 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026 अशी अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे. या काळात राजस्थान मधील शाळा बंद राहाणार आहेत.
त्याच बरोबर उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्येही लवकरच थंडीनुसार सुट्ट्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे मुलांना थंडीपासून संरक्षण मिळण्यासोबतच, कुटुंबासोबत वेळ घालवता येणार आहे. सध्या उत्तर भारतात एक प्रकार शीत लहर असल्याचं चित्र आहे. ज्या वेळी अशी स्थिती निर्माण होते त्यावेळी स्थानिक प्रशासन याची दखल घेत सुट्ट्या जाहीर करत असतं. त्यामुळे सध्या या सलग सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलं आहे.
नक्की वाचा - Viral Video: ट्रेनमध्ये होतेय दारूची खुलेआम विक्री, गुटखा, पानमसाला सोबत मिळतय बरच काही
शाळांना सुट्टी मिळाल्यामुळे विद्यार्थी वर्गात मात्र जल्लोषाचं वातावरण आहे. त्यांनी याचा आनंदच मानला आहे. शाळा असती तर सकाळी सकाळी थंडीतून उठावे लागत होते. पालकांनाही त्यांना सोडण्यासाठी शाळेत जावे लागत होते. पण आता त्याची चिंता मिटली आहे. त्यामुळे एक प्रकारे त्यांना दिलासाच मिळाला आहे. शिक्षकांनाही त्यामुळे विश्रांती मिळणार आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी उणे तापमान झाले आहे. डिसेंबरमध्येच ख्रिसमस निमित्तही शाळांना सुट्टी दिली जाते.