जाहिरात

Goa Fire: अंडरग्राऊंड किचन, आग लागल्याचा पत्ताच नाही, संपूर्ण किचन स्टाफ तडफडून तडफडून मेला

आग लागली याची ​किचन स्टाफला कल्पनाच नव्हती. हॉटेलचे किचन अंडरग्राउंड (तळघरात) होते.

Goa Fire: अंडरग्राऊंड किचन, आग लागल्याचा पत्ताच नाही, संपूर्ण किचन स्टाफ तडफडून तडफडून मेला
  • गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबमध्ये लागलेल्या आगीत जवळपास 25 जणांचा मृत्यू झाला आहे
  • आग फायर गन आणि फायर कँडल्समुळे लागली आणि लाकडी डेकोरेशनमुळे ती वेगाने पसरली होती
  • क्लबच्या तळघरातील साऊंडप्रूफ किचनमध्ये आग लागल्याची कल्पना स्टाफला नव्हती आणि ते धुरात अडकले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पणजी:

गुरूप्रसाद दळवी 

गोव्याच्या बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली. या आगीत जवळपास 25 जणांना आपला जीव गमवावा लागला. ही आग कशी लागली? या आगीला कारणीभूत कोण होते? आगीनंतर या क्लबमध्ये नेमकं काय घडलं याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यात या घटनेतील प्रत्यक्षदर्शिने याबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे.  हॉटेलमध्ये डान्स चालू असताना वापरल्या गेलेल्या 'फायर गन' किंवा 'फायर कँडल्स'मुळे ही आग लागली. हॉटेलचे डेकोरेशन लाकडी असल्याने आग वेगाने पसरली असं प्रत्यक्षदर्शिने सांगितलं आहे. 

आग लागली याची ​किचन स्टाफला कल्पनाच नव्हती. हॉटेलचे किचन अंडरग्राउंड (तळघरात) होते. शिवाय हे किचन  साऊंडप्रूफ होते. त्यामुळे वर क्लबमध्ये काय चाललं आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती. आग लागल्यानंतर धावपळ, आरडाओरडा किचनमधील स्टाफला ऐकू आला नाही असं ही त्यांनी सांगितलं. त्यात किचनमध्ये जाण्यासाठी आणि येण्यासाठी जो जिना होता, तिथूनच आगीचा धूर खाली गेला. त्यामुळे बाहेर पडायचा रस्ता बंद झाला होता. प्रचंड धुरामुळे किचनमधले कर्मचारी तिथेच अडकले. या दुर्घटनेत हॉटेलची संपूर्ण 'किचन टीम' यात मृत्यूमुखी पडली. डिश वॉशरपासून ते सिनियर शेफपर्यंत सर्वांचा गुदमरून मृत्यू झाला.

नक्की वाचा - काल पार्टी आज शोक..., गोव्याच्या नाइटक्लबमध्ये दुर्घटनेपूर्वीचं दृश्य; डान्स फ्लोअरवर थिरकताना दिसले पर्यटक

शिवाय या ठिकाणी आगीची सूचना देण्यासाठी कोणताही 'फायर अलार्म' वाजला नाही.  मॅनेजमेंटकडून खालील स्टाफला सांगण्यासाठी कोणीही गेले नाही. त्यात किचन स्टाफच्या कर्मचाऱ्यांचा आगीत जळून नाही, तर धुरामुळे श्वास गुदमरून (Suffocation) मृत्यू झाला. नाका-तोंडातून रक्त येण्याइतपत त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. किचन स्टाफमध्ये मृत्युमुखी पडलेले बहुतांश कर्मचारी तरुण होते. त्यांचे वय 18 ते 29 च्या दरम्यान होते. काही जण तर दोन-तीन दिवसांपूर्वीच कामावर रुजू झाले होते. ही सर्व माहिती शुभम पाटील याने दिली आहे. तो याच क्लबच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये शेफ होता. त्याचाही मित्र या आगीत मृत्यूमुखी पडला. 

नक्की वाचा - 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन गोव्याच्या किनाऱ्यावर? कोकण अन् दक्षिणेचा प्लानही ऑन; रेल्वेने दिली Good News

गोव्यामधून आगीची भयंकर दुर्घटना झाली आहे.  गोव्यातील यानाईट क्लबमध्ये रविवारी रात्री 1 च्या सुमारास सिलेंडरचा भीषण स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये तीन महिला, 20 पुरुषांसह आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे.  मृतांमध्ये काही पर्यटकांसह रोमियो लेनमधील क्लब बर्चचे कर्मचारी होते. या दुर्घटनेत 50 हून अधिक जखमी झाले आहेत.  त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  सिलिंडरच्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेत या क्लबच्या संपूर्ण किचन स्टाफचा मृत्यू झाला आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com