School Teacher Viral Video : शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं हे किती पवित्र आणि अनोखं असतं, हे सर्वांनाच ठाऊक आहे. शाळेच्या वर्गात शिक्षणाचे धडे गिरवून विद्यार्थी आपल्या ज्ञानात भर टाकतात. शिक्षकांनी जे काही शिकवतात, त्यानुसार विद्यार्थी त्यांच्या आयुष्यात बदल घडवतात. पालक त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी काबाडकष्ट करतात आणि चांगल्या शाळेत त्यांचं अॅडमिशन करतात. पण काही शाळांमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या घटना घडतात. काही शिक्षक निरागस विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करतात, अशाप्रकारच्या अनेक घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्या आहेत. असाच एका शिक्षिकेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
त्या शाळेत नेमकं काय घडलं?
जोनपूर बदलापूर पोलीस पोलीस स्टेशनच्या हद्दीत भलुआही येथे एक शाळा आहे. या शाळेत लहान मुलं-मुली वर्गात बसलेले असतात. त्याचदरम्यान एक शिक्षिका या निरागस विद्यार्थ्यांच्या कानशिलात लगावते आणि नंतर त्यांना छडीनेही मारते. शिक्षिकेनं विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने मारहाण केल्याचं कॅमेरात कैद झालं असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. व्हिडीओ पाहून यूजर्सने महिला शिक्षिकेवर जोरदार टीका केली आहे.
नक्की वाचा >> पुणे, सोलापूर का नागपूर ? तुमच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड करणारे आरोपी कुठले आहेत माहिती आहे का?
मॅडमचा पारा वाढला अन् नंतर जे केलं..पाहा व्हिडीओ
@tusharcrai नावाच्या यूजरने हा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, मॅडमचा पारा चढला, मुलांना जोरदार मारहाण..जौनपूरच्या बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भलुआहीं येथील पब्लिक स्कूलमध्ये लहान-लहान मुलांना मारहाण करताना मॅडम म्हणत होती, “सगळी जबाबदारी माझीच आहे का!” व्हिडिओ पाहून वाटतंय,घरचा राग मुलांवर काढत आहे का?