जाहिरात

आधी लगीन आमचं आणि मग..सर्वात खतरनाक बर्फाच्या डोंगरावर घेतले फेरे, कपलचा वेडिंग फोटोशूट व्हायरल!

कॅनडातील मेलिसा आणि डेवॉन यांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. बर्फाच्या डोंगरात केलेला फोटोशूट व्हायरल झाला आहे.

आधी लगीन आमचं आणि मग..सर्वात खतरनाक बर्फाच्या डोंगरावर घेतले फेरे, कपलचा वेडिंग फोटोशूट व्हायरल!
Couple Wedding Snowstorm Viral Video
मुंबई:

Couple Shocking Wedding Photoshoot Viral:  कॅनडातील मेलिसा आणि डेवॉन यांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. कोणत्याही परिस्थितीत लग्न पुढे ढकललं जाणार नाही, असा निर्णय त्यांनी घेतला आहे. 10 नोव्हेंबर रोजी त्यांना अल्बर्टा येथील पेट्यो लेक व्ह्यूपॉइंटवर लग्न करायचे होते. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतरही या कपलने ठरवले की ते ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या वेळीच लग्न करतील. या कपलने बॅनफ नॅशनल पार्कमध्ये त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तारेवरची कसरतच केली. दोघांनीही बर्फाच्छादित प्रदेशात जवळपास अर्धा तास चढाई केली. फोटोग्राफर मार्सिन आणि डोरोता कारपोविक्ज यांनीही या कपलसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी वधूने स्पष्ट म्हटलं की “हवामान कसेही असो, मला तिथेच लग्न करायचे आहे.”

बर्फ, वारा आणि गोठलेल्या हवामानात असं काही केलं..

कपल फोटोशूटसाठी ज्या ठिकाणी पोहोचले तिथे बर्फाचं मोठं वादळ आलं होतं. सर्व बाजूंनी जोरदार वाराही वाहत होता आणि चारही बाजूंनी बर्फाच्या कण पडत होते. अशा हुडहुडीच्या वातावरणाता या कपलने हातात हात घालून एकमेकांना वचनबद्ध केलं एका फोटोमध्ये वधूची केप हवेत लहरताना दिसते,तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही हसत हसत बर्फाच्या डोंगरावर चालताना दिसतात. 

बर्फाच्या डोंगरात केलेला फोटोशूट पाहिलात का?

या कपलने बर्फाच्या डोंगरात केलेला फोटोशूट इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की,ऑफिशिएंट कोल होफस्ट्रा यांनीही कोणताही भीती किंवा संकोच न बाळगता अतिशय हृदयस्पर्शी विधी पार पाडला. नंतर कपलने नॅशनल पार्कमधील इतर तलावांनाही भेट दिली.जिथे हवामान अनुकूल होतं.

कपलच्या वेडिंगच्या या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.व्हायरल पोस्टवर लोकांनी कमेंट्सचा वर्षावही केला आहे. एका यूजरने म्हटलंय,‘कमिटमेंटचा वेगळाच स्तर.अन्य एका यूजरने म्हटलंय, “ही चढाई खरंच लग्नाचे क्षण लक्षात ठेवण्यासारखी आहे." दुसऱ्या एकाने म्हटलं, “मीही नॅशनल पार्कमध्ये लग्न केले होते, पण हे तर त्याहूनही अधिक साहसी आहे.”

Listen to the latest songs, only on JioSaavn.com