
सप्टेंबर महिन्यात विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिन येत आहेत. या दिनांचे वेगळे महत्त्व असून हे दिन भारतासह जगभरात साजरे केले जातात. याशिवाय सप्टेंबर महिन्यात काही सणही येत आहेत. सप्टेंबर महिन्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिन म्हणजे शिक्षक दिन. 5 सप्टेंबर हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिन हा आपल्या शिक्षकांना आदरांजली वाहण्याचा दिवस आहे. हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा होतो. 15 सप्टेंबरला अभियंता दिन साजरा केला जातो, जो सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना समर्पित आहे. याशिवाय, अनंत चतुर्दशी, ओणम आणि नवरात्रीसारखे महत्त्वाचे सणही सप्टेंबर महिन्यात आहेत.
नक्की वाचा: 1 सप्टेंबरपासून तुमच्या खिशावर थेट परिणाम! GST, LPG आणि चांदीच्या नियमांमध्ये मोठे बदल; वाचा नवे नियम
16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात येतो, तर 22 सप्टेंबरला येणारा जागतिक गेंडा दिवस साजरा केला जातो. गेंड्यांच्या संवर्धनासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा दिवस आहे.
सप्टेंबर 2025 मधील काही महत्त्वाच्या दिवसांची यादी खालीलप्रमाणे आहे
- 1 ते 7 सप्टेंबर: राष्ट्रीय पोषण सप्ताह (National Nutrition Week)
- 2 सप्टेंबर: जागतिक नारळ दिन (World Coconut Day)
- 3 सप्टेंबर: स्कायस्क्रॅपर डे (Skyscraper Day)
- 4 सप्टेंबर: ईद-ए-मिलाद, राष्ट्रीय वन्यजीव दिन (Mawlid an-Nabi ( Eid-e-Milad an-Nabi), National Wildlife Day)
- 5 सप्टेंबर: शिक्षक दिन, ओणम (Teacher's Day, International Day of Charity, Onam (Thiruvonam))
- 6 सप्टेंबर: अनंत चतुर्दशी (Ananta Chaturdashi, Ganesh Visarjan)
- 8 सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन (International Literacy Day, World Physical Therapy Day)
- 10 सप्टेंबर: जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन(World Suicide Prevention Day)
- 14 सप्टेंबर: हिंदी दिवस (Hindi Diwas)
- 15 सप्टेंबर: अभियंता दिन (Engineer's Day, International Day of Democracy)
- 16 सप्टेंबर: मलेशिया दिन, जागतिक ओझोन दिन (Malaysia Day, World Ozone Day)
- 17 सप्टेंबर: विश्वकर्मा पूजा (Vishwakarma Puja, World Patient Safety Day)
- 21 सप्टेंबर: जागतिक शांतता दिन, महालया (International Day of Peace, World Alzheimer's Day, World Gratitude Day, Mahalaya)
- 22 सप्टेंबर: जागतिक गेंडा दिन, नवरात्रीचा पहिला दिवस (World Rhino Day, First Day Of Navratri Festival)
- 27 सप्टेंबर: जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day)
- 28 सप्टेंबर: जागतिक रेबीज दिन (World Rabies Day, National Sons Day, World Rivers Day)
- 29 सप्टेंबर: जागतिक हृदय दिन (World Heart Day)
- 30 सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन (International Translation Day)
नक्की वाचा: 30 दिवसांचा महिना 15 दिवस सुट्ट्या; बँका कधी बंद राहणार ? वाचा संपूर्ण यादी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world