
Friendship Day 2025 Date : कोणत्याही नात्यापेक्षा मैत्रीचे नाते अतिशय खास असते. निस्वार्थी असलेले हे नाते प्रत्येक सुखदुःखात कायम आपल्याला सोबत असते. याच नात्याचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे (Friendship Day 2025 Date) साजरा केला जातो. यंदा 3 ऑगस्ट (3 August 2025) रोजी जगभरात Friendship Day 2025 साजरा केला जाणार आहे. मैत्री दिन साजरा करण्यामागील उद्देश केवळ मैत्रीचे बंध मजबूत करणे नव्हे तर हा खास दिवस जुन्या सच्च्या हरवलेल्या मित्रांना पुन्हा एकदा भेटण्याची संधीही मिळवून देतो. मैत्रीचा दिनाची सुरुवात कशी झाली आणि या दिवसाचा इतिहास काय आहे, जाणून घेऊया...
फ्रेंडशिप डेची सुरुवात कशी झाली? (Friendship Day History)
मैत्री दिनाबाबत (Friendship Day 2025 Date) वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतात आहेत. असे म्हणतात की 1935 मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकेमध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. जेव्हा त्याच्या मित्राला (Friendship Day History) ही बातमी समजली तेव्हा तो ही गोष्ट सहन करू शकला नाही. आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती दुरावल्याच्या दुःखात त्या व्यक्तीनेही आत्महत्या केली. मैत्रीचे हे उदाहरण पाहून अमेरिकन सरकारने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे (Friendship Day 2025) साजरा करण्याची घोषणा केली होती. हळूहळू हा दिवस अमेरिकेव्यतिरिक्त अन्य देशांमध्येही साजरा केला जाऊ लागला.
दुसरीकडे संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) 2011 मध्ये 30 जुलै हा दिवस 'आंतरराष्ट्रीय मैत्री दिन' (International Friendship Day) म्हणून घोषित केला.
मैत्री दिनाचे महत्त्व (Importance of Friendship Day 2025)
1. मानवतेचे प्रतीक
मैत्री ही केवळ वैयक्तिक भावना नसून तर हे नाते मानवतेच्या एकतेचे प्रतीक आहे.
2. नात्यांना बळ देणारा दिवस
डिजिटल आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात मित्रमैत्रिणींच्या फारशा भेटीगाठी होत नाहीत. त्यामुळे किमान या दिवशी तरी आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींना भेटा, त्यांच्यासोबतचे मैत्रीचे नाते जपा.
3. संवाद
कधीकधी आपण घरातल्या सदस्यांसोबतही मनमोकळेपणाने संवाद साधत नाही. पण मित्रपरिवारासमोर मन मोकळे करणे अधिक सोपे वाटते. त्यामुळे मनभेद झाले तरी मैत्रीमध्ये मतभेद होऊ नये.
4. सहकार्य आणि आधार
आयुष्यात कितीही मोठे संकट ओढावले किंवा कठीण काळ आला तर मैत्रीचे नाते कायम आपल्याला मानसिक आधार देते.
5. आदर आणि कृतज्ञता
मित्रमैत्रिणींमध्येही टोकाचे वाद होतात, पण ते वाद जास्त काळ टिकता कामा नये. जेव्हा आपल्यासोबत कोणीही नव्हते तेव्हा याच सच्च्या मैत्रीने कायम साथ दिली, ही जाणीव कायम मनात असावी.
(नक्की वाचा: Happy Friendship Day 2025 Wishes: सच्च्या मैत्रीचे पक्के नाते, फ्रेंडशिप डेनिमित्त पाठवा या खास शुभेच्छा)
मैत्री दिनानिमित्त मित्र-मैत्रिणींना पाठवा खास मेसेज (Happy Friendship Day 2025 Wishes In Marathi)
1. आयुष्य आता बदलले आहे
पण ते जुने मित्र तसेच आहेत
मैत्री केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसते
कारण आपली मैत्री फार जुनी आणि सच्ची आहे
Happy Friendship Day 2025
2. तुझ्या मैत्रीने माझे आयुष्य बदलले
दिवस उजळले आणि दुःख दूर झाले
तू आहेस म्हणूनच मैत्रीला अर्थ आहे
Happy Friendship Day 2025
3. मैत्रीमुळे उद्ध्वस्त व्हायला होते, असे बरेच जण म्हणतात
मैत्री निभावणारा असेल तर अख्खं जग ते नाते लक्षात ठेवतं
Happy Friendship Day 2025
4. तुझ्यामुळे जीवन जगणे सोपे झाले
अगदी कठीण प्रसंगातसुद्धा
तुझी साथ हीच माझी ताकद आहे
मैत्री दिनाच्या खूप शुभेच्छा!
Happy Friendship Day 2025
5. तुझ्या हास्यात माझे जग दडलंय
आणि तुझ्या अश्रूंमध्ये माझे काळीज
मैत्री दिनी तुला एकच वचन
कायम तुझ्यासोबत असेन!
Happy Friendship Day 2025
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world