जाहिरात

कमी बजेटमध्ये परदेशात फिरण्याची संधी, 7 दिवसांची ट्रिप, फक्त 'एवढाच' खर्च

जर तुम्हाला या शानदार पॅकेजचा भाग व्हायचं असेल, तर तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन बुकिंग करावी लागेल.

कमी बजेटमध्ये परदेशात फिरण्याची संधी, 7 दिवसांची ट्रिप, फक्त 'एवढाच' खर्च

Travel September 2025: जर तुम्ही बऱ्याच काळापासून परदेशात फिरण्याचं स्वप्न पाहत आहात, पण बजेटमुळे अडचण येत असेल, तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. IRCTC ने एका देशात 7 दिवस आणि 6 रात्रींचं आंतरराष्ट्रीय टूर पॅकेज सुरू केलं आहे. यात खाण्या-पिण्यापासून ते राहण्यापर्यंत आणि प्रवासाची संपूर्ण व्यवस्था केली आहे. हा देश सौदर्याने नटलेला असून तुमची ट्रीप नक्कीच आनंददायी होईल. शिवाय कमी पैशात धम्माल मजा तुम्हाला या ट्रिपच्या माध्यमातून करता येईल.  

नेपाळ एवढं खास का आहे? । nepal trip cost
त्या देशाचं नाव आहे नेपाळ.  नेपाळ जरी आकारात लहान असला, तरी हा देश आपली संस्कृती, परंपरा आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. इथले बर्फाच्छादित डोंगर, प्राचीन मंदिरं आणि रोमांचक साहसी उपक्रम (एडवेंचर ॲक्टिव्हिटीज) कोणत्याही पर्यटकांचं मन जिंकून घेतात. म्हणूनच हे पॅकेज कुटुंब आणि मित्रांसोबत सुट्ट्या घालवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

ट्रिपची सुरुवात कधी आणि कुठून होईल? । nepal tour package
या पॅकेजअंतर्गत 12 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8:45 वाजता तुम्हाला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचावं लागेल. औपचारिकतेनंतर 11:10 वाजता विमानाने तुम्हाला गोरखपूरला पोहोचवलं जाईल. तिथून लुम्बिनीपर्यंत प्रवासाची व्यवस्था केली जाईल.

राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था । IRCTC Nepal tour package 2025
IRCTC ने तुमच्या राहण्याची आणि जेवणाची संपूर्ण काळजी घेतली आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला 3-स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय मिळेल. सोबतच, सकाळचा नाश्ता (Breakfast) आणि रात्रीचं जेवण (Dinner) या पॅकेजमध्ये आधीच समाविष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला खाण्या-पिण्याची कोणतीही चिंता करण्याची गरज नाही.

पॅकेजची किंमत किती आहे? । Nepal budget trip IRCTC
या नेपाळ ट्रिपची किंमत खूपच कमी ठेवण्यात आली आहे.

  • सिंगल शेअरिंग – 61,400 रुपये
  • डबल शेअरिंग – 48,330 रुपये
  • ट्रिपल शेअरिंग – 43,630 रुपये
  • मुलांसाठी (5 ते 11 वर्षे) – 38,200 रुपये

जर तुम्ही ग्रुप किंवा कुटुंबासोबत जात असाल, तर हे पॅकेज अजून स्वस्त ठरू शकतं.

बुकिंगची माहिती । Nepal family tour package
जर तुम्हाला या शानदार पॅकेजचा भाग व्हायचं असेल, तर तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन बुकिंग करावी लागेल. या पॅकेजचा कोड SHO6 आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com