September Holiday or Week Off : प्रत्येक महिन्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यातही बँकांना अनेक सुट्ट्या असतील. अशात जर बँकेत तुमचे काही महत्त्वाचे काम असेल तर आधीच ते पूर्ण करा. सोबतच तु्म्हाला बँकेतील सुट्ट्यांबाबत माहीत असायला हवं. अन्यथा अडचणीचा सामना करावा लागू शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सप्टेंबर 2025 मध्ये बँकेच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. या यादीनुसार सप्टेंबर 2025 मध्ये एकूण 15 दिवस बँका बंद राहतील. या सुट्ट्यांमध्ये नॅशनल, स्टेटसह सण-उत्सवांची सुट्टी सामील आहे.
एकत्रित बँका बंद होणार नाही
देशात बँका एकत्रितपणे बंद होणार नाहीत. अनेकदा एका राज्यात बँका बंद असतात तर दुसऱ्या राज्यात बँका खुल्या असतात. यासाठी तुम्हाला आपल्या राज्याची यादी जाणून घेणं आवश्यक आहे. सप्टेंबरमध्ये अनेक सुट्ट्या आहेत. प्रत्येक महिन्याप्रमाणे यंदाही सर्व बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल. याशिवाय प्रत्येक रविवारी बँक बंद असेल.
आठवड्याच्या सुट्ट्या
7 सप्टेंबर - रविवार
13 सप्टेंबर - दुसरा शनिवार
14 सप्टेंबर - रविवार
21 सप्टेंबर - रविवार
27 सप्टेंबर - चौथा शनिवार
28 सप्टेंबर - रविवार
या सण-उत्सवात बँका राहतील बंद
3 सप्टेंबर - कर्म पूजा – झारखंड
4 सप्टेंबर - ओणम - केरळ
5 सप्टेंबर - ईद-ए-मिलाद, तिरुवोनम आणि गणेश चतुर्थी – गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड आणि जम्मू
6 सप्टेंबर - ईद-ए-मिलाद आणि इंद्रजात्रा - सिक्कीम आणि छत्तीसगड
12 सप्टेंबर - शुक्रवार – जम्मू आणि श्रीनगर
22 सप्टेंबर - नवरात्री स्थापना – राजस्थान
23 सप्टेंबर - महाराजा हरिसिंह जयंती – जम्मू आणि श्रीनगर
29 सप्टेंबर - महाषष्ठी/महासप्तमी आणि दुर्गा पूजा – त्रिपुरा, आसाम आणि पश्चिम बंगाल
30 सप्टेंबर - महाष्टमी आणि दुर्गा पूजा - त्रिपुरा, ओडिशा, आसाम, मणिपूर, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंड
नक्की वाचा - Important news: 1 सप्टेंबरपासून बदलणार 'हे' नियम, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम
शाळांना या दिवशी असेल सुट्टी
बँकांनंतर आता शाळांना कधी कधी सुट्टी असेल याची माहिती घेऊया. राज्यांनुसार शाळांना वेगवेगळ्या दिवशी सुट्टी असू शकते. रविवारी देशभरातील शाळा बंद असतात.
5 सप्टेंबर - शिक्षक दिन
7 सप्टेंबर - रविवार
14 सप्टेंबर - रविवार
17 सप्टेंबर - ओणममुळे केरळ आणि आसपासच्या राज्यांना सुट्टी
21 सप्टेंबर - रविवार
22 सप्टेंबर - नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीमुळे देशातील अनेक राज्यांमधील शाळांना सुट्टी
28 सप्टेंबर - रविवार
30 सप्टेंबर - दुर्गा पूजा अष्टमीमुळे अनेक शाळा बंद आहेत.