Gurugram Crime News : हरियाणातील गुरुग्राममधील एका मोठ्या खासगी रुग्णालयातून संतापजनक घटना समोर आली आहे. रुग्णालयात ICU मध्ये वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यानेच हे दुष्कृत्य केले आहे. आरोपीची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पीडित महिला ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, त्या हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहल्यानंतर तिची तब्येत बिघडली होती. त्यानंतर 5 एप्रिल रोजी महिलेला गुरुग्राममधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून तिला रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.
(नक्की वाचा- Crime News: बीडपेक्षा सिंधुदुर्ग भयानक? खून केला, मृतदेह जाळला, 2 वर्षानंतर पर्दाफाश झाला, बोट राणेंकडे?)
तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, 6 एप्रिल रोजी मी व्हेंटिलेटरवर असताना, रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. एअर होस्टेसच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिने तिच्या पतीला घटनेबद्दल सांगितले, त्यानंतर तिच्या पतीने पोलिसांशी संपर्क साधला.
( नक्की वाचा : कशी असते UPSC परीक्षा? सरकारी अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं? )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीनंतर सोमवारी पोलीस ठाण्यात रुग्णालयातील अज्ञात कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. गुरुग्राम पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, पीडितेचा जबाब न्यायालयात दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांचे पथक रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहत असून लवकरच आरोपींची ओळख पटवली जाईल. आरोपीला लवकरच अटक केली जाईल.