सुरज कसबे, प्रतिनिधी
Pahalgam Terror Attack: काश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात तब्बल 27 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी आणि पुण्यातील कौस्तुभ गणबोटे, संतोष जगदाळे याशिवाय पनवेलमधील दिलीप देसले यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. आज पुण्यातील पर्यटकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शरद पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी कौस्तुभ गणबोटे यांनी त्यावेळेसचा धक्कादायक अनुभव सांगितला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यातील कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवार यांच्या समोर अंगावर काटा आणणारा अनुभव सांगितला. त्या ठिकाणी आम्ही घोड्यावर बसून गेलो. तेव्हा आम्हाला भीती वाटत होती. तिथं काही वेळ फिरत असताना अचानक काही लोक आले. ते आम्हाला अजाण म्हणायला सांगत होते. आम्ही तिथं असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ-मोठ्याने अजाण म्हणायला सुरुवात केली. पण त्यांनी आमच्या माणसांना मारून टाकलं. तिथे गेटवर एक मुस्लीम होता. तो दहशतवाद्यांना म्हणाला, तुम्ही कशाला निरपराध लोकांना मारता. त्यांनी काय चूक केली आहे? त्याला सुद्धा पुढे करून गोळ्या घातल्या. त्या पुढे म्हणाल्या, त्यांचा मित्र बाजूला उभा होता. त्याला बोलावून घेतलं आणि म्हणाला 'अजान पढता है क्या, पढता है क्या कुछ?' त्याचं बोलण ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि आम्ही सगळे अल्लाह हू अकबर म्हणायला लागलो. मात्र तरीही त्यांनी माझ्या नवऱ्याला गोळ्या घातल्या.
नक्की वाचा - Pahalgam Terrorist Attack: कुणाचा चायनीजमुळे तर कुणाचा घोड्यामुळे वाचला जीव, नेमकं काय घडलं?
त्यानंतर आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली. सैन्य दलाची देखील मदत झाली पण ती उशिरा झाली तोपर्यंत हे गेले होते. आम्ही पळत सुटलो तिथून तर चिखलात गुडघ्याइतके पाय खाली रुतत होते. मात्र कसंबसं करून आम्ही तिथून पळून गेलो. आमचे घोडेवाले मुस्लीम होते. पण ते खूप चांगले होते. आमच्यावर हल्ला झाल्यानंतर ते आम्हाला घ्यायला आले. आमच्या ड्रायव्हरनेही शेवटपर्यंत आम्हाला साथ दिली. हे सर्व पाहून तो ढसाढसा रडला, हे पाहताना ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणि संताप एकत्रितपणे दाटून आला होता.