Sensex चा 25,000 ते 75,000 चा प्रवास; मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजारात उसळी

सन्सेक्सने 9 एप्रिल 2024 रोजी पहिल्यांदा 75000 अंकांचा टप्पा गाठला होता. त्याशेअर सेन्सेक्स ऐतिहासिक 75,124.28 या ऑलटाईम हाय लेव्हलवर पोहोचला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

शेअर बाजार गेल्या काही दिवसांपासून तेजीत दिसत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी आपल्या ऑल टाईम हायवर पोहोचले आहेत. दरम्यान एनडीटीव्ही ग्रुपला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 जूननंतर निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात उसळी येईल. शेअर बाजार असा वधारेल की, प्रोग्रामर देखील दमतील,असं भाकित केलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. त्यानंतर आठवडाभर शेअर बाजारात तेजी दिसेल. प्रोग्रामिंग करणारे देखील थकतील. 2014 मध्ये सेन्सेक्स 25000 वर होता, जो आज 75000 पर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच दहा वर्षात सेन्सेक्स तिपटीने वाढला आहे. 

(नक्की वाचा- Exclusive : लोकसभा निवडणूक निकालानंतर शेअर बाजाराचा कल कसा असेल? पंतप्रधान नरेेंद्र मोदींचं मोठं भाष्य)

सन्सेक्सने 9 एप्रिल 2024 रोजी पहिल्यांदा 75000 अंकांचा टप्पा गाठला होता. त्या दिवशी सेन्सेक्स ऐतिहासिक 75,124.28 या ऑलटाईम हाय लेव्हलवर पोहोचला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यादिवशी सेन्सेक्समध्ये 1470 अंकांची उसळी पाहायला मिळाली. मोदी सरकार बनल्यानंतर सेन्सेक्सने 25000 अंकांचा टप्पा पार केला होता. 

सेन्सेक्सचा 25000 ते 75000 चा प्रवास

  • सेसेक्सने 10 वर्षांपूर्वी 16 मे 2014 रोजी 25,000चा टप्पा गाठला 
  • 26 एप्रिल 2017 रोजी सेन्सेक्सने 30,000 चा टप्पा गाठला 
  • 3 जून 2019 च्या रोजी 40,000 चा टप्पा पार केला 
  • 3 फेब्रुवारी 2021 ला पहिल्यांना सेन्सेक्सने 50,000 च्या टप्पावर पोहोचला 
  • त्यानंतर 24 सप्टेंबर 2021 ला पहिल्यांदा सेंसेक्सने 60000चा टप्पा पार केला 
  • सेन्सेक्सने 9 एप्रिल 2024 रोजी 75000 टप्पा गाठला

(नक्की वाचा- ऑनलाईन शॉपिंग करताना तुमचा खिसा कसा कापला जातो; या ट्रॅपमधून कसं वाचाल?)

जगातील चौथा सर्वात मोठा शेअर बाजार

मोदी सरकारच्या कार्यकाळात 10 वर्षात शेअर बाजार तीनपट वाढला आहे. सर्व लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप वाढून 4.5 ट्रिलियन डॉलरहून अधिक झाला आहे. भारत आता अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँगनंतर चौथा सर्वात मोठा शेअर बाजार बनला आहे. 

Advertisement